दूरध्वनीचा शोध लावून संदेश वहनाचे नवे तंत्र शोधून काढणारे शास्त्रज्ञ “अलेक्झांडर ग्रॅहम बेल” scientist alekzendar graham bel
(३ मार्च, १८४७ २ ऑगस्ट, १९२२)
दूरध्वनीचा शोध लावून संदेश वहनाचे नवे तंत्र शोधून काढणारा शास्त्रज्ञ
अलेक्झांडर त्यांचा जन्म एडिबर्ग स्काटलैंड येथे झाला. २३व्या वर्षी प्रा. बेल यांनी बहिऱ्या लोकांना सोपी संभाषणाची कार्यपद्धती समजावून सांगण्याची पद्धत विकसित केली. या महान कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले.
बेल हे वाचाशास्त्राचे शिक्षक होते; पण ध्वनिविज्ञानाचे फोनेटिक्स विशेषतज्ज्ञ होते. बोस्टन विदयापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकवण्यासाठी प्रोफेसर म्हणून त्यांची नेमणूक झाली. बहिऱ्या लोकांना शिकवण्यासाठी नवनवीन पद्धती तो तयार करत होता. बहिऱ्यांसाठी ऐकण्याचे काम करू शकेल असे एक यंत्र बेलने तेव्हा तयार केले होते. या तंत्रज्ञानाचे प्रयोग करत असतानाच बेल ‘मेबल ह्युबर्ड’ नावाच्या एका बहिऱ्या मुलीच्या प्रेमात पडला. थोड्याच दिवसांत ते विवाहबद्ध झाले. मेबलने बेलला पटवून दिले की, ‘ओठांची हालचाल वाचणे’, हाच बहिऱ्यांसाठी बोलणे समजून घेण्याचा सर्वोत्तम व व्यवहारी मार्ग आहे. त्यामुळे तो त्या दिशेने प्रयोग करू लागला. ‘सुसंवादी तारायंत्र’ तयार करण्याचे प्रयत्न चालू होते. या प्रयत्नांमध्ये टेलिफोनच्या शोधाची बीजे होती. ध्वनीची कंपने विद्युतप्रवाहाच्या साहाय्याने तारेतून पाठविता येणे शक्य आहे, ही कल्पना बेलच्या डोक्यात रुजली.
ग्रॅहम बेल शास्त्रोक्त दृष्टीने विचार करू लागले की, ज्या प्रकारे विद्युतधारेद्वारे निरनिराळ्या ध्वनिलहरी विद्युततारेमध्ये रूपांतरित करून त्या एकाच तारेमार्फत एका जागेहून दुसऱ्या जागी का म्हणून जाऊ शकणार नाहीत? दुसऱ्या जागी या विद्युतधारेमधील निरनिराळ्या ध्वनिलहरी परत मूळ ध्वनीत रूपांतरित होऊ शकतील किंवा कसे? एका खोलीत अलेक्झांडर बसला होता आणि दुसऱ्या खोलीत त्याचा साहाय्यक वॉटसन बसला होता. आपल्या हातांतील छोटेसे यंत्र तोंडाजवळ घेऊन अलेक्झांडर हळू आवाजात पुटपुटला, “Come here Watson, I want you.”
दुसऱ्या खोलीत बसलेल्या वॉटसनने आपल्या हातांतील यंत्र कानाजवळ लावलेले होते. त्या यंत्रातून त्याने अलेक्झांडरच्या आवाजातील हे वाक्य जसेच्या तसे ऐकले होते आणि इतिहास घडला. ग्रॅहम बेलला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वप्नामधला दूरध्वनीचा आविष्कार प्रत्यक्षात उतरला, बेलने चिमटा घेतला व हा मानवी ध्वनी खरा असल्याची खात्री करून घेतली. वॅटसनच्या बोटाचे रिडतार मोकळी करण्याचे जे काम केले, त्यातूनच कंप निर्माण होऊन ध्वनीच्या लहरी तारेमार्फत ग्रॅहम बेल यांनी ट्रान्समिटर ज्या खोलीत ठेवले,
त्या तारेद्वारा ध्वनिलहरींचे आगमन झाले. हाच तो टेलिफोन शोधण्याच्या कार्यातला मुख्य दुवा होय. ज्यामुळे ‘ध्वनी उर्जा’ ही विद्युत ऊर्जेत रूपांतरित करून तारेद्वारा पोहोचविता येऊ शकते. आणि परत विद्युतऊर्जेचे रुपांतर ध्वनिऊर्जेत होऊ शकते. प्रा. अलेक्झांडर बेलला एका विशिष्ट ध्वनि लहरींचेच रूपांतर तारेद्वारा पाठवण्यात यश आले.
पहिले ओबडधोबड यंत्र तयार झाले. १५ फेब्रुवारी, १८७६ रोजी बेलने अमेरिकेच्या ऑफिसात आपल्या शोधाचे पेटंट मिळवण्यासाठी अर्ज केला होता. परंतु बेलप्रमाणेच आणखी चार जणांनी बेलच्या कल्पनेवर त्यांचा हक्क सांगितला. हे ‘टेलिफोन युद्ध पुढे बरेच रंगलें.’ परंतु शेवटी टेलिफोनच्या शोधाचे सर्व श्रेय बेललाच मिळाले. बेलने याच सुमारास टेलिफोनशिवाय फोटो फोन आणि ग्रामोफोन अशी आणखी दोन यत्रे तयार केली होती. ग्रामोफोन हा एडिसनने तयार केलेल्या ग्रामोफोनच्या तत्त्वावर होता. एकदा अलेक्झांडर बेलने अनेक वनस्पतींचे नमुने गोळा केले होते. त्याचा शेजारी बेन हार्ड मन हा त्यांचा जिव्हाळ्याचा मित्र होता. बेनच्या वडिलांची पिठाची गिरणी होती. गहू दळण्यापूर्वी गव्हावरील टरफले काढावी लागत. हे काम अगदी जिकिरीचे असे आणि वेळही खूप लागे. एकदा बेनचे वडील दोघा मित्रांना म्हणाले, “तुम्ही काही तरी निरूपयोगी उदद्योग करत बसता त्यापेक्षा काही उपयोगी पडेल असे काम का करत नाही?” अलेक्झांडर लगेच म्हणाला, “तुमच्या गिरणीसाठी मी काय करू शकतो ते सांगा.” बेनच्या वडिलांनी गव्हावरची टरफले काढण्यातली अडचण सांगितली. तेव्हा अलेक्झांडरने एक यंत्र बनविले त्यामुळे टरफले काढणे सोयीचे झाले.
हवेत उघडण्यासाठी यांत्रिक शक्तीवर चालणारा भला मोठा पतंग बनवला होता. या पतंगात माणूस बसण्याचीही व्यवस्था होती; पण हा पतंग उडू शकला नाही. १८८५ मध्ये बेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ‘द अमेरिकन टेलिफोन अॅण्ड टेलिग्राफ कंपनी’ची स्थापना केली होती. या टेलिफोन कंपनीलाही ‘बेल टेलिफोन कंपनी’ असे नाव देण्यात आले. संदेशवहन प्रणालीबाबत अशा तन्हेने क्रांतिकारक युग सुरू करणारा शास्त्रज्ञ म्हणून अलेक्झांडर बेलचे असलेले महत्त्व लक्षात येते.









