१५ ऑगस्ट २०२५, भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा करणेबाबत पूर्व तयारी indian independence day celebration on fifteen august
संदर्भ :- मा. मंत्री महोदय शालेय शिक्षण व मा. आयुक्त शिक्षण यांच्या दि.04.08.2025 रोजीच्या व्ही.सी. मधील सूचना.
मा. मंत्री महोदय शालेय शिक्षण व मा. आयुक्त शिक्षण यांची दि.04.08.2025 रोजी उपरोक्त विषयी व्ही.सी. संपन्न झाली सदरहू व्ही. सी. मध्ये खलीलप्रमाणे सूचना देणेत आलेल्या आहेत. तरी या सुचनांस अनुसरुन कार्यवाही करावी.
1. दि. १५ ऑगस्ट 2025 भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनी सर्व शाळांत संगितमय कवायती होतील याचे नियोजन सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी करावे. पर्यवेक्षीय यंत्रनांनी आपल्या अधिनस्त सर्व शाळांना कळवावे. यापूर्वी याबाबतची ध्वनीचित्रफित पाठविणेत आलेली आहे. स्वातंत्र्यदिनी सर्व विद्यार्थी-विदयार्थीनी स्वच्छ पोषाखामध्ये व निटनेटके असतील याची सर्व शाळा मुख्याध्यापकांनी खात्री करावी. स्वातंतत्र्यदिनी पाऊस असल्यास कवायतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा.
2. ज्या गावात एकापेक्षा अधिक शाळा असतील त्या सर्व शाळांनी शक्य असल्यास एकत्रित कवायत करणेबाबत नियोजन करावे.
3. दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुट्टी देत असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर बाब योग्य नसून सर्व शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनी कवायतीसह उत्साहात कार्यक्रम होतील अशा सूचना द्याव्यात.
4. दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या (सर्व व्यवस्थापनाच्या) शाळा भेटीचे नियोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व प्रशासन अधिकारी, मनपा/नपा यांनी करावे. यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, व इतर पर्यवेक्षीय यंत्रणेस मदतीला घेवून वरील प्रमाणे कार्यवाही होत असल्याची खात्री करावी.
5. राज्याच्या मराठी भाषा धोरणानुसार सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जाते का? याची पाहणी करावी. तसेच राष्ट्रगीतानंतर राज्यगीत म्हटले जाते का? याची देखील पाहणी करावी.
6. लाभार्थी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा गणवेश मिळाल्याची खात्री गटशिक्षणाधिकारी यांनी करावी. ज्या शाळांमध्ये चांगल्या दर्जाचा गणवेश पुरवठा झालेला नाही त्या पुरवठादारांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करावी.
7. “एक पेड माँ के नाम अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. नपा/मनपा हद्दीमध्ये जेथे जागेची कमतरता आहे तेथे वृक्षरोपण कुंडीत करावे.
8. ऑगस्ट महिन्यात येणारे रक्षाबंधन, गणेशोत्सव यासारख्या सणांमध्ये शाळांना राखी तयार करणे तसेच मूर्ती तयार करणे यासारखे कार्यानुभवाचे उपक्रम घेणेबाबत सूचित करावे.
9. संत ज्ञानेश्वर यांच्या 750 व्या जयंतीवर्षानिमित्त दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी सर्व शाळांमध्ये पसायदान घ्यावे.
10. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांच्या कार्याची ओळख सर्व विद्यार्थ्यांना करुन द्यावी. उपरोक्त प्रमाणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी संयुक्त स्वाक्षरीसह सर्व शाळांना सूचना निर्गमित करावे.











