कब-बुलबुल, स्काऊट गाईड व रोव्हर-रेंजर युनीट नोंदणी व पुनःनौंदणी करणेबाबत kab bulbul skaut guide unit registration 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कब-बुलबुल, स्काऊट गाईड व रोव्हर-रेंजर युनीट नोंदणी व पुनःनौंदणी करणेबाबत kab bulbul skaut guide unit registration 

संदर्भ :- राज्य कार्यालय परिपत्रक ओएस-५६/३९२/२०२५-२६ दिनांक ३० मे २०२५

परिपत्रक येथे पहा pdf download

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील शाळा सुरु झालेल्या आहेत. त्यानुषंगाने प्रती वर्षाप्रमाणे या वर्षात देखील शाळा तेथे कब-बुलबुल, स्काऊट गाईड, रोव्हर-रेंजर युनिट सुरु करावे. स्काऊट गाईड हा शालेय विद्यार्थ्यांवर देश प्रेम, राष्ट्रनिष्ठा, हसत खेळत शिक्षणाद्वारे संस्कार क्षम नागरिक निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी शैक्षणिक चळवळ आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांनी स्काऊट गाईड सारख्या विद्यार्थ्यावर सर्वांगीण सुसंस्कार घडवणाऱ्या तसेच परस्पर बंधुभाव सहकार्याची भावना, निसर्ग शिक्षण, समाज विकास कार्यक्रमाची ओळख व जाणीव निर्माण करण्याचे आदर्श व चारित्र्य संपन्न पिढी घडवणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांना शिस्त लावणाऱ्या आणि शाळेच्या वैभवात भर घालणाऱ्या सहशालेय उपक्रमाची निवड करुन शाळेत तुकडी निहाय पथक स्थापन कराये. तसेच सोबतच्या वार्षिक नियोजनाप्रमाणे सर्व कार्यक्रम उपक्रम शालेय स्तरावर राबविणे,

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण बांधील असून त्यासाठी स्काऊट गाईड हा एकमेव उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे. मुलांसाठी स्वतंत्र पथक व मुलींसाठी स्वतंत्र पथक असावे मुलींच्या पथकासाठी शिक्षिकाच युनिट लिडर असावी. (फ्लॉक लिडर, गाईड कॅप्टन, रेंजर लिडर) नोंदणी फीचा तपशिल खालील प्रमाणे दिला आहे. त्यानुसार नोंदणी अर्ज भरुन स्काऊट गाईड कार्यालयाकडे दिनांक १५/०७/२०२५ पूर्वी फीसह जमा करून नोंदणी प्रमाणपत्र / पावती घ्यावी. शाळेच्या आस्थापनेवर स्त्री शिक्षिका / शिक्षिकेत्तर पदमान्य असेल तर गाईड युनिट सुरु करणे अनिवार्य आहे याची नोंद घ्यावी.

परिपत्रक येथे पहा pdf download

Related posts:

Leave a Comment