क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti
विद्या नाही, ज्ञान नाही,
ते घेण्याची आवड नाही,
असुनी बुध्दी चालत नाही,
तयास मानव म्हणावे का?
असा महत्वपुर्ण प्रश्न आपल्या काव्यातुन निर्माण करून अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या स्त्रियांना मार्ग दाखविणारी खरी विद्येची “देवी असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८श मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगांव येथे झाला.” आज सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिना निमित्ताने मी आज तुम्हाला त्यांच्या जीवनाविषयी चार शब्द सांगणार आहे.
आपला भारत देश जेव्हा इंग्रजाच्या गुलामगिरीत होता. तेव्हा मुलींना शिक्षणाची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. शिक्षण फक्त मुलांनाच दिले जात असे. मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये समाजात भेदभाव केला जात असे. शाळेत मुलींना कोणीही पाठवत नव्हते. त्या काळात मुलगी म्हणजे फक्त उपभोगाचे साधन समजायचे. तिला कोणतेही अधिकार नव्हते तिला तुच्छतेचा दर्जा दिला जात होता. चूल आणि मूल हेच तिच्या नशिबी होते. महान क्रांतीकारी महात्मा ज्योतीबा फुले यांनी सावित्रीबाई सोबत सन १८४० ला विवाह केला. त्यावेळी सावित्रीबाई अवघ्या ए वर्षाच्या होत्या. स्त्रीयांना अशी दिलेली वागणूक ज्योतीबांना आवडत नसे. त्यावेळी त्यानी ठरवले कि जर स्त्रीयांना या जगात मानाचे स्थान मिळवून द्यायचे असेल तर पहिल्यांदा स्त्री सुशिक्षित झाली पाहिजे. त्यांनी सर्व प्रथम स्वतःच्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाईना शिकवण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांनी स्त्री शिक्षणा विषयी पहिले पाऊल टाकले. सावित्रीबाईना लिहिता वाचता येत नव्हते. ज्योतिबांनी सावित्रीबाई शिकविले सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकल्या. जेव्हा ज्योतिबा सावित्रीबाईं धडे शिकवित होते. त्यावेळी समाजातील अशिक्षित लोक टोमणे मारायचे व त्यांची थट्टा करायचे. पण त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली व त्या शिकल्या. सुशिक्षित झाल्या. ज्योतिबांच्या मनात स्त्रियांना शिक्षण द्यावे, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. पुण्यामध्ये सन १८४८ ला मुलींची पहिली शाळा उघडली.
त्या शाळेत पहिली महिला शिक्षक म्हणून सावित्रीबाईंची निवड झाली. त्या काळी लोक अडाणी, अज्ञानी होते. जेव्हा सावित्रीबाई शाळेत जाण्यास घरून निघायच्या तेव्हा गावचे लोक त्यांच्या अंगावर शेण, दगड फेकून मारायचे. बरेचदा सावित्रीबाईंचे कपडे खराब व्हायचे. परंतू मनात तीव्र जिद्द असल्याने त्या कोणालाही घाबरल्या नाहीत. कारण मान आणि अपमान यांच्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. अपमानाच्या दिशेकडे पाठ फिरविली व शिक्षण सुरूच ठेवले. तसेच शेतकऱ्यांच्या मुलींना व मुलांना दिवसा वेळ मिळत नव्हता म्हणून सावित्रीबाईनी रात्रीची शाळा उघडली. १८६४ ला त्यांनी अनाथ बाल आश्रम सुरू केले. त्यांच्या या कार्यचे इंग्रजांनी सुध्दा स्वागत केले. एवढे महान कार्य एका स्त्रीने संपूर्ण भारतीय स्त्रियांकरीता केले. त्यांचे ऋण भारतीय स्त्री कधीही फेडू शकणार नाही.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
एवढ्या मधून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत









