महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची यादी maharashtra state all caste list
संदर्भ :
१) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन पत्र क्र. संकीर्ण-२००८/यादी/प्र.क्र.५५३/मावक-५, दि.२६ सप्टेंबर २००८
२) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. सीबीसी-१०/२०१०/प्र.क्र.१०४/मावक-५. दि.१९ जुलै २०११
३) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन पत्र क्र. सीबीसी-१०/२०१२/प्र.क्र.१९४/मावक, दि.०१ सप्टेंबर २०१२
४) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन पत्र क्र. सीबीसी-१०/२०१२/प्र.क्र.३१७/मावक, दि. १८ ऑक्टोबर २०१२
५) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन पत्र क्र. सीबीसी-१०/२०१२/प्र.क्र.३८/मावक, दि.०६ मार्च २०१३
६) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. सीबीसी-१०/२००८/प्र.क्र.५९७/मावक, दि.१८ ऑक्टोबर २०१३
७) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. सीबीसी-१०/२००८/प्र.क्र.५९७ सुधारित/मावक, दि.३० जानेवारी २०१४
८) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. सीबीसी-१०/२०१४/प्र.क्र.०९/मावक, दि.०१ मार्च २०१४
९) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. सीबीसी-१०/२०१३/प्र.क्र.३५/मावक, दि.१५ जुलै २०१४
१०) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. सीबीसी-१०/२०१४/प्र.क्र.८८/मावक, दि.०४ सप्टेंबर २०१४
११) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र. सीबीसी-१०/२००८/प्र.क्र.५९७/मावक, दि.११ सप्टेंबर २०१४
१२) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन शुद्धीपत्र क्र. विपताप्र/२०१५/प्र.क्र.६२/मावक, दि.०७ जुलै २०१५
१३) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र. सीबीसी-१०/२०१७/प्र.क्र.८७/मावक, दि.३० डिसेंबर २०१७
१४) विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, शासन निर्णय क्र. सीबीसी-२०१९/प्र.क्र.७२/मावक, दि.०४ जून २०१९
१५) विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, शासन निर्णय क्र. सीबीसी-२०१९/प्र.क्र.७२/मावक, दि.१३ जून २०१९
१६) विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र. सीबीसी-२०१९/प्र.क्र.७२/मावक, दि.२८ जून २०१९
१७) इतर मागासवर्ग सामाजकि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, शासन निर्णय क्र. बैठक-२०१८/प्र.क्र.४७/मावक, दि.०१ ऑगस्ट २०१९
१८) इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्र. आयोग-२०२४/प्र.क्र.६०/मावक, दि.०६ ऑगस्ट २०२४ (१)
१९) इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्र. आयोग-२०२४/प्र.क्र.६०/मावक, दि.०६ ऑगस्ट २०२४ (२)
२०) इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्र. आयोग-२०२४/प्र.क्र.२३२/मावक, दि.२४ सप्टेंबर २०२४
शासन परिपत्रक :-
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची अद्ययावत यादी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्रमांक-१, दि.२६ सप्टेंबर २००८ च्या शासन पत्रान्वये प्रसिद्ध केली आहे.
२. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जाती जमाती संदर्भातील नियमन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत करण्यात येते. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाचे जाती प्रमाणपत्र देणाऱ्या व त्यांची पडताळणी करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यांना तसेच मागासवर्गीयांचे लाभ लागू करताना सदरहू यादीचा उपयोग व्हावा याकरीता सुलभ संदर्भासाठी एकत्रित संकलन स्वरूपाची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
३. सदर यादी ही संकलन स्वरूपाची असून, मागासवर्गीय जाती जमातीच्या निश्चितीसाठी तसेच त्या त्या मागासप्रवर्गाचे लाभ लागू करताना, सदर जाती जमातींचा ज्या शासन निर्णय वा आदेशान्वये समावेश केलेला आहे ते शासन निर्णय व आदेश ग्राह्य धरण्यात यावेत.
४. सदरहू शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असून, त्याचा संकेताक २०२५०१०९११२९०५५६३४ असा आहे. सदर शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,









