उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ? उभयान्वयी अव्ययाचे प्रकार व उदाहरण marathi conjunction example

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ? उभयान्वयी अव्ययाचे प्रकार व उदाहरण marathi conjunction example

उभयान्वयी अव्यय व्याख्या

उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्ये एकत्र करण्याचे किंवा जोडण्याचे काम करतात.

उभयान्वयी अव्यय हे फक्त शब्द किंवा वाक्ये एकमेकांना जोडण्याचे काम करते. वाक्यात इतर कोणतेही कार्य ते करत नाही.

काही विकारी शब्द वाक्ये जोडण्याचे काम करतात; पण ती अव्यये नाहीत

उदा.

जसा-तसा, जितका-तितका, जिथे-तिथे

“जिथे समाधान तिथे शांती”

वरील वाक्यामध्ये “जिथे-तिथे” ही संबंधी विशेषणे आहेत. ती समाधान आणि शांती या दोन शब्दांना जोडण्याचे कार्य करत आहेत; पण ते विकारी शब्द आहेत. ती अव्यये नाहीत. म्हणून त्यांना उभयान्वयी अव्यये असे म्हणता येणार नाही.

आणि, व, शिवाय, त्यामुळे, परंतु, अथवा ही उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे दिली आहे.

उदा.

आशा एकाचवेळी शेव व चिप्स तळत होती.

वरील वाक्यात ‘व’ हा शब्द उभयान्वयी अव्यय म्हणून वापरलेला आहे.

या वाक्यामध्ये ‘व’ हे उभयान्वयी अव्यय ‘वडे’ आणि ‘भजी’ या दोन शब्दांना जोडण्याचे काम करत आहे.

उदा.

➡️संदीपने ताटातले सर्व पदार्थ खाल्ले पण टोमॅटोची भाजी खाल्ली नाही.

वरील वाक्यात ‘पण’ हा शब्द उभयान्वयी अव्यय म्हणून वापरलेला आहे.

या वाक्यामध्ये ‘पण’ हे उभयान्वयी अव्यय “संदीपने ताटातले

सर्व पदार्थ खाल्ले” आणि “टोमॅटोची भाजी खाल्ली नाही” या दोन वाक्यांना जोडण्याचे काम करत आहे.

उदा.

➡️रविना बाहेर पडली अन पाऊस सुरू झाला.

वरील वाक्यात ‘अन्’ हा शब्द उभयान्वयी अव्यय म्हणून वापरलेला आहे.

या वाक्यामध्ये ‘अन्’ हे उभयान्वयी अव्यय “रविना बाहेर पडली” आणि “पाऊस सुरू झाला” या दोन वाक्यांना जोडण्याचे काम करत आहे.

उदा.

➡️अजयने आज पोळी व भाजी खाल्ली.

वरील वाक्यात ‘व’ हा शब्द उभयान्वयी अव्यय म्हणून वापरलेला आहे.

या वाक्यामध्ये ‘व’ हे उभयान्वयी अव्यय ‘पोळी आणि भाजी’ या दोन शब्दांना जोडण्याचे काम करत आहे.

उभयान्वयी अव्ययाची उदा. खालील प्रमाणे

➡️ अनुने भात शिजवला आणि कढीला फोडणी दिली.

➡️आज त्यांनी बाजारातून गहू, तांदूळ अन् बाजरी विकत घेतली.

➡️ राधाने नृत्य केले; शिवाय गाणेही गायले.

➡️ गणेशने गाण्याचा खूप रियाज केला; म्हणून त्याचे गाणे छान झाले.

➡️पावसाला सुरूवात झाली आणि मोर नाचायला लागला.

➡️शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांचा गोंगाट सुरू झाला.

उभयान्वयी अव्ययाचे दोन मुख्य प्रकार

1. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय

2. गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

मुख्य वाक्य आणि गौण वाक्य अशा दोन वाक्यांना जोडणारे उभयान्वयी अव्यय.

प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय माहिती पाहुया

दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

जेव्हा एखाद्या उभयान्वयी अव्ययाने जोडली गेलेली वाक्ये ही स्वतंत्र किंवा समान दर्जाची असतात, म्हणजेच एकमेकांवर अवलंबून नसतात, तेव्हा अशा उभयान्वयी अव्ययाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात.

➡️प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय हे वाक्ये एकत्र करण्याचे किंवा जोडण्याचे काम करते.

➡️प्रधानत्वसूचक उभयान्वयी जोडलेली वाक्ये ही स्वतंत्र किंवा समान दर्जाची असतात. म्हणजेच, ती एकमेकांवर अवलंबून नसतात.

➡️प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय हे फक्त वाक्ये एकमेकांना जोडण्याचे काम करते. वाक्यात इतर कोणतेही कार्य ते करत नाही.

उदा.

➡️शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांचा गोंगाट सुरू झाला.

वरील वाक्यात ‘अन्’ हे उभयान्वयी अव्यय ‘शाळेची घंटा वाजली’ आणि ‘ विद्यार्थ्यांचा गोंगाट सुरू झाला’ या दोन वाक्यांना जोडण्याचे काम करत आहे.

ही दोन्ही वाक्ये स्वतंत्र किंवा समान दर्जाची असून ती एकमेकांवर अवलंबून नाहीत. त्यामुळे ‘अन्’ हे प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय समजावे.

उदा.

➡️पावसाला सुरूवात झाली आणि मोर नाचायला लागला.

वरील वाक्यात ‘आणि’ हे उभयान्वयी अव्यय ‘पावसाला सुरूवात झाली’ आणि ‘मोर नाचायला लागला’ या दोन वाक्यांना जोडण्याचे काम करत आहे.

ही दोन्ही वाक्ये स्वतंत्र किंवा समान दर्जाची असून ती एकमेकांवर अवलंबून नाहीत. त्यामुळे ‘आणि’ प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय समजावे.

उदा.

➡️कढी छान झाली होती पण भात कच्चा होता.

वरील वाक्यात ‘पण’ हे उभयान्वयी अव्यय कढी छान झाली होती’ आणि ‘भात कच्चा होता’ या दोन वाक्यांना जोडण्याचे काम करत आहे.

ही दोन्ही वाक्ये स्वतंत्र किंवा समान दर्जाची असून ती एकमेकांवर अवलंबून नाहीत. त्यामुळे ‘पण’ हे प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय समजावे.

Related posts:

Leave a Comment