राज्यातील जिल्हा परिषद/महानिगरपालिका/खाजगी अनुदानित/विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत mazi vidhyarthi sangh 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील जिल्हा परिषद/महानिगरपालिका/खाजगी अनुदानित/विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत mazi vidhyarthi sangh

संदर्भ :

– शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०२५/प्र.क्र.३०५/एस.डी.४ दिनांक ०१/१०/२०२५.

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने शासनाने शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषद/महानिगरपालिका/खाजगी अनुदानित/विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत संचालनलयास कळविले आहे.

त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना शासन निर्णयातील बाबी निदर्शनास आणाव्यात. तसेच आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांस सर्व शाळामध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करणेकरिता सूचित करुन त्याचा अहवाल संचालनालयास माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन पार पडलेल्या शाळेचे नाव, तालुका, जिल्हा, तसेच त्यांचे फोटो व व्हिडीओ या स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला कशी मदत झाली व त्या मदतीचे स्वरुप काय होते अशी एकत्रित माहिती https://forms.gle/VqM9JvDBziDWDQ8i8 या गुगल फॉर्मवर भरण्यासाठी आपल्या अधिनस्त सर्व जिल्हा परिषद/महानिगरपालिका/खाजगी अनुदानित/विनाअनुदानित शाळांना सूचित करावे.

शासन परिपत्रक pdf download

 

Related posts:

Leave a Comment