माजी विद्यार्थी संघामार्फत आयोजित शैक्षणिक व गुणवत्तावर्धन उपक्रमांची माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्यावत करण्याच्या सुविधेबाबत mazi vidhyarthi sangha
संदर्भः- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक ०१/१०/२०२५
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक १/१०/२०२५ नुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत व माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने आयोजित करण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना आवाहन करण्यात आले आहे.
तरी उपरोक्त शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघामार्फत शाळांमध्ये आयोजित माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने, विविध उपक्रम याबाबत ची माहिती व फोटो अद्यावत करण्यासाठी सुविधा सरल (SARAL) पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगीन स्तरांवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी माजी विद्यार्थी संघ स्थापनेच्या अनुषंगाने शाळांमध्ये आयोजित माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने, विविध उपक्रम याबाबत ची माहिती व फोटो सरल (SARAL) पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्यावत करण्याबाबत आपल्यास्तरावरुन सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा.










