परीक्षेच्या आयोजनाच्या सुधारित दिनांकाबाबत mpsc exam ayojan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

परीक्षेच्या आयोजनाच्या सुधारित दिनांकाबाबत mpsc exam ayojan 

(१) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ (जाहिरात क्रमांक ११७/२०२५)

(२) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ (जाहिरात क्रमांक १२४/२०२५)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ च्या परीक्षेचे आयोजन दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या कालावधीत करण्यात आले होते. तथापि, राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक ०२ डिसेंबर, २०२५ रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित केले आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी असल्याने त्यासंदर्भात काही मुद्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली होती.

२. आयोगाने उपरोक्तप्रमाणे मागविलेल्या माहितीच्या अनुषंगाने काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेवून त्यांनी परीक्षा आयोजित करण्यास अडचणी उद्भवू शकतात असे कळविले आहे. सदर वस्तुस्थिती विचारात घेता प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

३. सदर निर्णयानुसार विषयांकित दोन्ही परीक्षेचा सुधारित दिनांक खालीलप्रमाणे राहील :-

Related posts:

Leave a Comment