राज्याच्या एका सेवेतून राज्याच्या दुस-या सेवेत दि.१.११.२००५ नंतर रुजु होणा-या कर्मचा-यांना लागु होणा-या निवृत्तीवेतन योजनेबाबत स्पष्टीकरण nivruttivetan yojana
शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अंनियां १००५/१२६/सेवा ४, दिनांक ३१ ऑक्टोबर २००५ अन्वये राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवोन “परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना” लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेली संदर्भाधिन क्र.२ व ३ची अनुक्रमे दि.२४.२.२००९ व १६.७.२००९ची परिपत्रक रद्द करण्यात येत आहेत.
२. वरील योजनेसंदभांत शासन आणखी असा खुलासा करीत आहे को. दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी शासन सेवेत निवृत्तिवेतनार्ह आस्थापनेवर कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचा-याने त्याच किंवा अन्य विभागातोल निवृत्तीवेतनाहं आस्थापनेच्या पदावरील नियुक्तीसाठी दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी किवा त्यानंतर अर्ज केला असेल आणि त्याला दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नवीन पदावर नियुक्त करण्यात आले असेल तर अशा प्रकरणी शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक: अंनियो १००६/८७/सेवा ४, दिनांक १२ जानेवारी २००७ मधील (i) ते (iv) येथे नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता झाल्यास संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ व सर्वसाधारण र्भावष्य निर्वाह निधी योजना लागू ठरतील. या परिपत्रकात नमूद केलेल्या (i) ते (iv) येथील सर्व अटींची पूर्तता ज्या प्रकरणी होन नसेल, अशा शासकीय कर्मचाऱ्यास नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू ठरेल.
३. वरील स्पष्टीकरण जिल्हा परिषदा तसेच ज्यांना सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तिवेतन योजना व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू आहे. अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठे इत्यादीच्या सेवेमध्ये दि. १.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, योग्य त्या फेरफारांसह, लागू ठरेल.
४. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आने असून त्याचा संकेतांक २००९०८१८१७१७५८००१ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










