प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सन 2025 च्या कार्यवाही बाबत विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 व भाग 2 बाबत online teacher transfer portal 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सन 2025 च्या कार्यवाही बाबत विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 व भाग 2 बाबत online teacher transfer portal

संदर्भ :-

1) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्रमांकः जिपब 2023/प्र.क्र. 118/ आस्था-14 दि. 18.06.2024.

2) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. जिपबी/शिविप्रा/प्रावि-1अ/कावि/0682/2025 दि.12/02/2025

3) या कार्यालयाकडून वेळोवेळी ग्रुपवर दिलेल्या सुचना व या कार्यालयाची पत्रे.

4) महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, शासन परीपत्रक क्रमांकः जिपब 2023/प्र.क्र. 118/ आस्था 14 दि. 16.06.2025.

5) सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रं अप्रवी-218/प्र.क्रं46/आरोग्य 06 दि. 14/09/2018 व दिव्यांग कल्याण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सुचना व परीपत्रके,

उपरोक्त विषयी व संदर्भान्वये आपणास कळविण्यात येते की, जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठीचे सुधारीत धारेण निश्चीत करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय दि. 18/06/2024 अन्वये व्याख्या 1.8 मध्ये विशेष सवर्ग शिक्षक भाग एकमध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी सादर केलेले दिव्यांगत्वा बाबतचे ऑनलाइन युडी-आयडी प्रमाणपत्राबाबत आपल्या तालुकास्तरीय नेमन्यात आलेल्या त्रिसदस्य समितीने आपणाकडे संवर्ग । च्या शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्राची तपासणी संदर्भ क्रं 05 अन्वये दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार पडताळणी करुन शिक्षकांच्या दिव्यांगत्वा बाबत अथवा आजाराबाबत तसेच दिव्यांग मुलाचे पालक, ज्या शिक्षकाचे जोडीदार शासन निर्णयामध्ये नमूद दिव्यांग, गंभीर आजाराने ग्रस्त आहेत अशा शिक्षकाबाबत काही साशंकता आढळून आल्यास संबंधित शिक्षकांची जिल्हा शल्य चिकीत्सक अथवा स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालय अंबाजोगाई यांच्याकडे त्यांच्या बदली अर्जात नमूद केलेल्या दिव्यांगत्व व आजाराबाबत पुर्नतपासणी करुन घेण्यात यावी याची संपूर्ण जबाबदारी आपणावर राहील.

विशेष संवर्ग 01 मधून बदली सन 2025 अंतर्गत आपल्या तालुक्यातील संवर्ग-1 मध्ये बदलीसाठी होकार / नकार करीता अर्ज फॉर्म सादर केलेल्या घटस्फोटीत / परीत्यक्ता माहिला शिक्षकाबाबत मा. न्यायालयाने मंजुर केलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणित प्रत, परीत्यक्ता शिक्षीकेने

पतीबरोबर राहत नसल्या बाबत सादर केलेले स्वयंघोषणापत्र, त्यांच्या रहिवासाचे दाखले, आधार कार्ड, शिधा पत्रिका इत्यादीवरुन पडताळणी करावी तसेच अशा महिल्या शिक्षकांच्या आवश्यकतेनुसार निवासी पत्यावर प्रत्यक्ष सोबत दोन महिला कर्मचारी घेवून जाऊन शहानिशा करावी. व भेटीचा अहवाल सादर करावा.

तसेच शासन निर्णय मधील व्याख्या 1.09 विशेष संवर्ग शिक्षक भाग 02 मध्ये गणले जाण्यासाठी शिक्षकांनी सादर केलेले प्रमाणपत्र तसेच 4.3 अन्वये सादर कलेले प्रमाणपत्र, अंतराचे निकष प्रमाणपत्र व पती पत्नी यांच्या सेवा विषयक कार्यरत प्रमाणपत्र इत्यादी बाबतची तपासणी करावी पती पत्नी शासन निर्णयानुसार संवर्ग शिक्षक भाग 02 मध्ये व्याख्या 01.09 मध्ये दर्शविल्या प्रमाणे सेवेत कार्यरत नसल्यास संवर्ग भाग 02 च्या बदली प्रक्रिया सन 2025 मध्ये लाभ घेतल्यास त्यास आपण स्वतः व संबंधित जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.

उपरोक्त प्रमाणे शासन निर्णय संदर्भ क्रमांक 01, 04 व 05 मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार आवश्यक ती कोणत्याही प्रकारची अनिमीतता न होता योग्य ती कार्यवाही पार पाडवी. तसेच दिव्यांग व वैद्यकीय आजाराच्या प्रमाणपत्रामध्ये व घटस्फोटाच्या आदेशामध्ये तसेच परीत्यक्ता असल्या बाबतच्या स्वंयघोषणा प्रमाणपत्रामध्ये व संवर्ग भाग 02 च्या पती पत्नीच्या चुकीच्या सेवेतील कार्यरत प्रमाणपत्र व अंतराच्या प्रमाणपत्रामध्ये कोणत्यही प्रकारची अनियमितता केल्याचे आढळुन अल्यास, अशा शिक्षकांवर आपल्या स्तरावरुन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच संबंधित शिक्षकांवर निलंबन व शिस्तभंग विषयक कार्यवाही करणे बाबतचा प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करावा अशा शिक्षका विरुद्ध कार्यवाही न झाल्याचे आढळुन आल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चीत करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या बाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दि. १९/०६/२०२५ रोजी पर्यंत या कार्यालयास सादर करावा. सोवतः-

1) संदर्भ क्रं 04 चे शासन परीपत्रक.

Related posts:

Leave a Comment