थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत. सन २०२५-२६. मुदतवाढ online thakit vetan mudatvadh
संदर्भ- १) शासन निर्णय क. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकिर्ण २४१५/ (३४/१५) अर्थसंकल्प
दि. १५.०७.२०१७
२) संचालनालयाचे पत्र शिसंमा/२०२५-२६२०२५२-२६/टी-७/वकित ऑनलाईन मुदतवाढ ५० दि.२१.०९.२०२६
३) संचालनालयाचे पत्र शिसंमाप/शिक्षक शिक्षकेत्तर/ २५-२६//टी-७/थवे/ आय / १६८
दि.२७.०१.२०२६,
४) संचालनालयाचे पत्र शिसंमा/२०२५-२६/४६६९/टी-७/यकित / ऑनलाईन मुदतवाढ ५०
दि.१०.०२.२०२६
५) संचालनालयाचे पत्र शिसंमा/२०२५-२६/४६६९/टी-७/वकित / ऑनलाईन मुदतवाड/३९
दि.२१/०२/२०२६
६) संचालनालयाचे पत्र लिसंमा/२०२५-२६/टी-बी/श्रफित ऑनलाईन मुदतवाड /१७४०७०९
दि.२४/०२/२०२६
विषयांकित प्रकरणी संदर्भ पवाचे तसेच त्यामध्ये नमूद प्रत्येक संदर्भाचे अवलोकन करावे संदर्भिय शासन निर्णयानुसार प्रलंबित चकित देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येतात मुख्याध्यापक, अधीक्षक वेतन पथक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक, व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत पुर्ण तपासणी करून ती देयके नियमानुसार देय असल्याची खात्री करून सदर देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर होणे आवश्यक आहे.
यामध्ये लाभायर्थी कर्मचा-याची वैयक्तीक मान्यतेची खात्री करणे, ज्या कालावधीतील त्याचे देयक आहे त्या कालावधीत सदर व्यक्तीने खरोखच त्या शाळेत सैनिकी शाळेत / उच्च माध्यमिक शाळेत काम केले होते. त्याची मान्यता बैंक डेटेड केलेली नाही याची खातरजमा करणे, प्रकरणाची डिजीटेशन मध्ये असणा-या दस्तावेजानुसार पडताळणी करणे, मान्यतेचे मुळ दस्तवेज वेतन पथक, शिक्षणाधिकारी / विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आहे का? या बाबत खतरजमा करणे इत्यादी बाबी समाविष्ट आहेत. जर थकित देयकातील लाभाची कर्मचा-याची एसआयटी तपासणी मान्यता चुकीची निघाली तर देयके सादर करणा-या संबधित लाभार्थी कर्मचारी, मुख्याध्यापक, अधिकारी यांचे वर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत.
प्राप्त परिस्थितीत मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावरील प्रलंबित देयकांची संख्या पाहता थकित देयकाची आर्थिक व प्रशासकीय चौफेर तपासणी करूनच देयके संचालनालयास सादर करणेसाठी दि. १२/०३/२०२६ पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे.
यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी









