परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) या कार्यक्रमाबाबत pariksha pe charcha
संदर्भ :
१. मा. सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र.डीओ.नं.२०६/२०२५ पीपीसी (पीटी-२) दि.०२/१२/२०२५.
२. संचालनालयाचे पत्र क्रमांक क्र. शिर्स/संकीर्ण/परीक्षा पे चर्चा/ए-२/विद्याशाखा/५५०२ दि.०३/१२/२०२५.
३. संचालनालयाचे पत्र क्रमांक क्र. शिर्स/संकीर्ण/परीक्षा पे चर्चा/ए-२/विद्याशाखा/५५४१ दि.०८/१२/२०२५.
४. संचालनालयाचे पत्र जा.क्र. शिस/उमा/विद्या-अ-१/संकीर्ण/परीक्षा पे चर्चा/२०२५-२६/५६४० दिनांक १७/१२/२०२५
५. सहसचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे दिनांक २२/१२/२०२५ रोजीचा व्हॉटसअॅप संदेश.
६. संचालनालयाचे पत्र जा.क्र. संकीर्ण/परीक्षा पे चर्चा/ए-२/विद्याशाखा/५६८१ दि.२२/१२/२०२५
७. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र जा.क्र. मप्राशिप/सशि/परिक्षा पे चर्चा/२०२५-२६/३९७३ दिनांक ३१/१२/२०२५
८. मा. आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र अ.शा.प.क्र. आशिका/स्वी.स./परीक्षा पे चर्चा/२०२६/२२९० दिनांक ०१/०१/२०२६
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संचानालयाच्या संदर्भ क्रमांक २, ३२,४ व ६ च्या पत्रान्वये परीक्षा पे चर्चा २०२६ (PPC-२०२६) साठी सहभागी होण्यासाठी दिनांक ०१ डिसेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान https://innovateindia.mygov.in या संकेतस्थळावर इयत्ता ६ बो ते १२ वीचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी ऑनलाईन MCQ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सर्व सहभागीस सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना केंद्रशासनाच्या पत्रातील बाबी निदर्शनास आणाव्यात. तसेच आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांस परोक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) मध्ये जास्तीत जास्त विद्याध्यर्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी सहभागी व्हावे. याकरिता सूचित करुन त्याचा अहवाल संचालनालयास सादर करावा. असे सूचित करण्यात आलेले होते.
महाराष्ट्र राज्यासाठी परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) या कार्यक्रमामध्ये एकूण ६५,२६,९९९/- इतके विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी होण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. तथापि, दिनांक ०२/०१/२०२६ रोजी पर्यंत विद्यार्थी ८,१५,४७५, शिक्षक-५१०४९ व पालक-१७७४४ यांनी परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले आहेत. (जिल्हानिहाय दिनांक ०२/०१/२०२६ रोजीचा विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे सहभागाचा वेगवेगळा अहवाल सोबत जोडला आहे.)
सदर नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत तसेच या वर्षाच्या उद्दिष्टापेक्षा (६५,२६,९९९) अतिशय असमाधानकारक आहे. याबाबत वरिष्ठांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, असे मा. आयुक्त (शिक्षण) यांचे संदर्भ क्रमांक ८ अन्वये संचालनालयास सूचित केलेले आहे. (सोबत संदर्भीय पत्राची प्रत जोडली आहे.)
सदरील बाबत परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) या कार्यक्रमामध्ये एकूण ६५,२६.९९९/- इतके विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी उद्दिष्ट साध्य होण्यासाठी https://innovateindia.mygov.in या पोर्टलवर नोंदणी उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक यांची राहील याची नोंद घ्यावी. त्यासाठी संबंधित जिल्हयातील मुख्याध्यापकांची व क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदर उद्दिष्ट पूर्ण करण्याची दक्षता आपल्या स्तरावरून घेण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या संचालनालयास पाठवावा.











Thank you honrable pm for this initiative.your advice on competing with ourselves instead of others realy helps reduce exam pressure.
requesting plz make platform for poor and needy students for carrier activities
How are you going to adopt the new education policy?