प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना करारनामा शालेय पोषण आहार (तांदूळ) शिजवून देण्यासंबंधी करारलेख pm poshan mid day meal 

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना करारनामा शालेय पोषण आहार (तांदूळ) शिजवून देण्यासंबंधी करारलेख pm poshan mid day meal 

संदर्भ :-

१) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना २००६

२) केंद्रशासन आदेश क्र.F.NO.१-१/२००९-DESK (MDM) २४/११/२००९

३) केंद्रशासन आदेश क्र. F.NO.३-५/२०१०-DESK (MDM) दि. २९/०४/२०१०

४) शिक्षण संचालक (प्राथ) यांचे पत्र क्र.शा.पो.आ.सु.यो./२०१०-११/प्राशिस/३०३/३४०९ दि.१९/१०/२०१०

५) शासन निर्णय क्र. शापोआ २०१०/प्र.क्र.१८/प्राशि/दि.२/२/२०११

६) शिक्षण संचालक (प्राथ) यांचे पत्र जा. क्र.प्राशिसं/शापोआ/स्वयंपाकी/२०२२/१७०८ दि.१९ सप्टें. २०२२

७) शासन निर्णय क्र. शापोआ २०२२/प्र.क्र.१३०/एस.डी.३/दि.९/२/२०२३

८) शासन निर्णय क्र. शापोआ २०२२/प्र.क्र.११७/एस.डी.३/दि.११/०६/२०२४

वरील संदर्भीय आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समिती जि.प.प्राथ.शाळा

यांचे मार्फत सौ.

यांची सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी स्वयंपाकी म्हणून नेमणूक खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात आली आहे. सदर करार हा मानधनावर नेमणूक केलेले स्वयंपाकी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यात झाला असल्याने नेमून दिलेले काम समाधानकारक रित्या करत नसेल तर संबंधितांची नेमणूक रद्द करण्याचा शाळा व्यवस्थापन समितीस अधिकार राहील.

वरील निकषांनुसार ग्रामीण भागातील शाळेमध्ये अन्न शिजवण्याचे काम करणाऱ्या मदतनीस या कामासाठी महिला बचत गट किंवा स्वयंसेवी संस्था किंवा मानधनी तत्वावरील पदासाठी स्वतंत्रपणे अनुदान देण्यात येणार असल्याने त्यांना खालीलप्रमाणे काम करणे आवश्यक राहील.

अ) अन्न शिजवण्याचे काम करणे,

ब) तांदूळ धान्यादि मालाची साफसफाई करणे.

क) शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर साफसफाई करणे, स्वयंपाकगृह तसेच सांडलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावणे,

ड) भांड्यांची साफसफाई करणे व जेवल्यानंतर ताटांची स्वच्छता करणे. इ) पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे.

फ) शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे.

ग) अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेच्या आहारविषयक नोंदी ठेवणे.

सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ६९२/१०/व्यव-५ दिनांक २३/११/२०१० अन्वये

निर्गमित करण्यात येत आहे. तरी पक्ष क्र.२ यांना वरील सर्व अटी व नियम मान्य असून शालेय पोषण आहार शिजवण्यास तयार आहेत.

त्यांच्यामध्ये दि. // २०२५ रोजी करारच्या स्वरुपात हा करार विलेख करण्यात आलेला आहे.

Leave a Comment