प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांना स्वयंपाकगृह उपकरण संचाचा पुरवठा करण्याबाबत pm poshan shakti mid day meal 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांना स्वयंपाकगृह उपकरण संचाचा पुरवठा करण्याबाबत pm poshan shakti mid day meal 

संदर्भ:-१. या कार्यालयाचे पत्र क्र. प्राशिस/पीएम पोषण/२०२५-२६/०३९९.

दि.०४/११/२०२५.

२. मे. मफतलाल इंडस्ट्रीज लि. मुंबई यांचे पत्र दि.०९/०३/२०२६.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२५-२६ या वित्तीय वर्षामध्ये आपल्या शाळेसाठी स्वयंपाकगृह उपकरण संच (प्राथमिक/उच्च प्राथमिक) उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदरचा पुरवठा M/s Mafatial Industries Limited, Mumbai यांचे मार्फत आपल्या शाळेस करण्यात येत आहे. तसेच सदर स्वयंपाकगृह उपकरण संच स्विकारण्याबाबत आपणास सविस्तर मार्गदर्शक या कार्यालयाचे संदर्भाधीन दिनांक दि.०४/११/२०२५ च्या पत्रान्वये आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. प्रस्तुत प्रकरणी आपणास कळविण्यात येते की,

१. पुरवठादाराने आपल्या शाळेस संपर्क साधुन सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पुरवठा करण्याची तयारी दर्शविल्यास शाळेतील आपण स्वतः किंवा शाळेतील इतर जबाबदार शिक्षकाची नेमणूक सदरील स्वयंपाकगृह उपकरण संच स्विकारण्यासाठी करण्यात यावी.

२. उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे शाळांच्या वेळा मध्यान्हापर्यंत असतात, अशा परिस्थितीमध्ये देखील साहित्य पुरवठा होणार असल्यास अशा वेळेत संबधीत मुख्याध्यापकांनी स्वयंपाकगृह उपकरण संच स्विकारण्यासाठी आपण स्वतः किंवा शाळेतील इत्तर जबाबदार शिक्षकाची नेमणूक करावी.

३. सदरचे साहित्य पुरवठ्यास कालमर्यादा आहे. तथापि, परिक्षेचा कालावधीमध्ये शाळेमध्ये परिक्षेची यंत्रणा बाधीत होणार नाही याची दक्षता घेवून सदरचे स्वयंपाकगृह उपकरण संच ताब्यात घेण्यात यावेत.

Related posts:

Leave a Comment