प्राथमिक शिक्षकांच्या दैनंदिन ऑनलाईन कामांबाबत primary school online work 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक शिक्षकांच्या दैनंदिन ऑनलाईन कामांबाबत primary school online work 

१) प्राथमिक शिक्षकांच्या दैनंदिन ऑनलाईन कामांबाबत

२) प्रत्येक मराठी केंद्रशाळेला एक डाटा ऑपरेटर व शिपाई देणेबाबत

संदर्भ :- महाराष्ट्र राज्य एकल प्राय. शिक्षक सेवा मंचाचे प्रसिध्दी प्रमुख, राज्य कोषाध्यक्ष, राज्य सरचिटणीस, राज्य कार्याध्यक्ष,

राज्याध्यक्ष यांचे पत्र क्र.५५. दि.७/१/२०२६

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचाने संदर्भिय दि.७/१/२०२६ ध्या निवेदनानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षक ऑनलाईन कामामुळे पुरता सैरभैर झालेला असुन त्यांना विदयार्थ्यांच्या दैनंदिन अध्यापनाकडे लक्ष देता येत नाही यासाठी त्याअनुषंगाने खालील २ महत्वपूर्ण मागण्या मान्य करण्यास विनंती करण्यात आली आहे. (प्रत संलग्न)

१) प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन कामाबाबत –

प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्राथमिक शिक्षकांची सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

सततच्या लिंक टाकणे व त्या तात्काळ भरण्यास सांगणे, यामुळे शिक्षकांचा भरपुर वेळ विनाकारण वाया जाणे, रेंज नसणे, माहिती भराच असे सांगितले जाणे अशामुळे प्राथमिक शिक्षक रात्रंदिवस माहिती भरण्यामध्येच गुंतला असतो या सर्व अतिरिक्त कामामुळे महाराष्ट्रातील शिक्षक त्रस्त झालेला असुन शासनाने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. त्याला कुटुंबाकडे लक्ष दयायला वेळ मिळत नाही. जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त प्रकारची अॅप्स व त्यामध्ये लिंकद्वारे माहिती भरावी लागणे, सदर अॅप्सची यादी जोडण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवशी रविवारी लिंक टाकुन विदयार्थ्यांना त्या लिंक मोबाईलवर भरण्यास सांगणे हे बंद करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. यासर्व परिस्थितीमुळे पालकांना, शिक्षक मुलांना काहीच शिकवत नाहीत सारखे मोबाईलवरच असतात असे वाटते. ही सर्व प्रशासनाची माहिती शिक्षक स्वतःच्याच मोबाईलवरुन भरत असतात त्यासाठी कोणतीही वेगळी यंत्रणा उपलबध नाही. मग शिक्षकांनी शिकवायचे कधी ? असा प्रश्न उपस्थित करुन या सर्व गोष्टींसाठी शिक्षण विभाग सर्वस्वी जबाबदार आहे. असे निवेदनात नमुद केले आहे.

इतर सर्व कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा केला असतांना शिक्षकांना मात्र सातही दिवस काम करावे लागते. मग उदयाची सक्षम पिढी घडवितांना शिक्षकांचे मानसिक स्वास्थ कसे राहणार याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे नमुद करुन या अशा परिस्थितीमुळे भविष्यकाळात मराठी शाळांचा पट कमी झाल्याशिवाय राहणार नाही असे नमुद करण्यात आले आहे. असे होऊ नये यासाठी सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करुन राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना पुर्णवेळ अध्यापनाचेच काम करुन दयावे ही विनंती करण्यात आली आहे.

२) प्रत्येक मराठी केंद्र शाळेला एक डाटा ऑपरेटर व शिपाई देणेबाबत –

मराठी शाळेत लहान लहान विदयार्थी शिकत असतात, परंतु या शाळांना डाटा ऑपरेटर व शिपाई ही पदे नसल्यामुळे ही सर्व कामे शिक्षकांना व लहान मुलांनाच करावी लागतात. मग याठिकाणी अध्ययन अध्यापन प्रक्रिया कशी घडणार ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

सदर बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक केंद्रशाळेला एक डेटा ऑपरेटर व एक शिपाई दयावा जेणेकरुन शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचा ताण कमी होण्यास मदत होऊन शिक्षकांना पुर्णवेळ शिकवता येईल.

अशाप्रकारे राज्यातील सर्व प्राथमिक शाळांचा दर्जा व त्या शाळेत शिकणा-या सर्वच विदयार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपरोक्त नमुद दोन्हीही मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य एकल प्राथ. शिक्षक सेवा मंचाने संदर्भिय निवेदनानुसार, प्राथमिक शिक्षकांची सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करण्यात यावीत व प्रत्येक मराठी केंद्र शाळेला एक डाटा ऑपरेटर व शिपाई देणेत यावा या दोनही मागण्या महत्वपुर्ण असुन त्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

उपरोक्त दोन्ही बाबी हया धोरणात्मक स्वरुपाच्या असल्यो संदर्भिय पत्रासह याअनुषंगाने पुढील कार्यवाहीसाठी सादर.

Related posts:

Leave a Comment