दिनांक २६ जानेवारी, २०२६ या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत republic day sanchalan

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिनांक २६ जानेवारी, २०२६ या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत republic day sanchalan

संदर्भ :- १. शासनाचे परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एसडी-४, दिनांक ३१ डिसेंबर २०२४.

२. शासनाचे परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एसडी-४, दिनांक १९ जुलै, २०२५.

३. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र जा.क्र. आस्था-क/प्राथ१०६/स्वदि-प्रदि/२०२५/१३३९७५० दिनांक २३/०७/२०२५

४. संचालनालयाचे पत्र जा.क्र. शिसंमा/स्वादि-प्रदि/ए-२/विद्याशाखा/२०२४-२५/३९०४ दिनांक २५/०७/२०२५.

५. शासनाचे पत्र क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एसडी-४, दिनांक २६ नोव्हेंबर, २०२५.

राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत संदर्भाधीन क्रमांक १ येथील परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

२) देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याचे आयोजन करण्याबाबत संदर्भ क्रमाकं २ येथील पत्रान्वये कळविण्यात आले होते व याकरिता कवायतीच्या मार्गदर्शक व्हिडीओची लिंक उपलब्ध करून देण्यात आली होतो.

३) दिनांक २६ जानेवारी २०२६ या प्रजासत्ताकदिनी संदर्भ क्रमांक १ येथील शासन परिपत्रकान्वये सूचित करण्यात आलेले उपक्रम शाळांमध्ये घेण्यात यावे. त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक २ येथील पत्रानुसार दिनांक १५ ऑगस्ट, २०२५

रोजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्याप्रमाणे देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रमदेखील प्रजासत्ताकदिनी घेण्यात यावा.

४) राज्याचा शासकीय झेंडा वंदन व केंद्र शासनाचा शासकीय झंडा वंदन कार्यक्रमानंतर शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचे आयोजन व्हावे. कवायत संचलनाचा कार्यक्रम साधारणतः वीस मिनिटे इतक्या कालावधीचा असावा,

५) देशभक्तीपर गीतांवरील कवायतीचा मार्गदर्शक व्हिडीओ तयार करण्यात आला असून, त्याची लिंक https://drive.google.com/file/d/१tm०७३३x६३९XT-१८uyWuKILT५१WrMTRZY/view याप्रमाणे आहे.

दिनांक २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम महत्वाच्या सूचना-

१. आपणांस उपरोक्त मुद्दा क्रमांक ५ नुसार पुरविलेल्या नमुना मार्गदर्शक व्हिडीओ (१४.४० मिनिटांचा) नुसार कवायत संचलन आयोजित करावे.

२. प्रस्तुत कार्यक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिक दृष्ट्या कसरत/व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.

३. प्रस्तुत कार्यक्रम राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये आयोजित करण्यात यावा.

४. सामुहिक कवायत संचलन असल्यामुळे गावातील, शहरातील मैदानाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी एका मैदानावर एकत्र करून कार्यक्रम आयोजित करावा.

५. कार्यक्रमास आपल्या परिसरातील मा. लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक व समाजसेवी गणमान्य प्रतिनीधींना आमंत्रित करण्यात यावे.

६. प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांचा सामुहिक स्वरुपात कवायत संचलन सराव करून घेण्यात यावा.

७. कार्यक्रम आयोजनानंतर शाळांनी आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शासनाच्या पोर्टलवरील दिलेल्या लिंकवर अपलोड करावयाचा आहे.

८. कार्यक्रमाचे दिवशी मैदान स्वच्छ, पांढऱ्या रंगाने पट्टे आखून, हिरवी चटई टाकलेले, देशभक्तीमय वातावरण असलेले असावेः जेणेकरून विद्यार्थ्यांचा गणवेश खराब होणार नाही.

९. विद्यार्थ्यांना कार्यक्रमापूर्वी व कार्यक्रमानंतर अल्पोपहार (चहा, बिस्कीट, फळे, पाणी) देण्यात यावीत.

१०. विद्यार्थ्यांची नखे काढलेली, कटिंग, गणवेश स्वच्छता, स्वच्छ बूट व पायमोजे, हाताला वेणीला तिरंगा रंगाची पट्टी, रिबीन असल्यास योग्य असेल.

११. कार्यक्रमाचे वेळी सर्व मैदानात ध्वनी यंत्रणा, स्पीकर, माईक, स्टेज, बॅनर, ड्रोण, व्हिडिओ व फोटो कॅमेरा याची व्यवस्था करण्यात यावी. एक दिवस अगोदर सर्व सुविधा व्यवस्थित चालत आहेत का ? याची पडताळणी करून घ्यावी.

१२. विद्यार्थी सरावासाठी प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक मार्गदर्शनासाठी नेमण्यात यावा.

१३. विद्यार्थ्यांचा दर शुक्रवार व शनिवारी सराव करण्यासाठी आपल्या शाळेतील कवायत निर्देशक (PT शिक्षक, क्रीडा शिक्षक, NCC चे विद्यार्थी किंवा इतर शिक्षकाची) मदत घेण्यात यावी.

१४. सरावानुसार कार्यक्रमाच्या दिवशी मार्गदर्शक व्यक्ती स्टेजवर कवायत नमुना दाखवेल व विद्यार्थी त्याचे मागून कवायत साजरी करतील.

१५. कवायत कार्यक्रम आटोपल्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षकांनी आपले विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची खात्री करावी. विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचण्याबाबत जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांची राहील.

१६. गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण उपनिरीक्षक, विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्र प्रमुख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांचे योग्य नियोजन करावे. कोणत्या गावातील/शहरातील शाळेतील किती विद्यार्थी, कोणत्या शाळेतील मैदानावर येणार आहेत ? मैदान क्षमता, विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था, पार्किंग सुविधा आदि. बाबीची पडताळणी करावी. कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची खात्री करण्यात यावी.

१७. आजारी, अशक्त किंवा ज्या विद्यार्थ्यांना कवायत करणे शक्य नसेल अशा विद्यार्थ्यांना शक्यतो कवायतीतून सूट देण्यात यावी, त्यांना कुठलीही सक्ती करू नये.

१८. पावसाळयाचे वातावरण वाटल्यास कवायत संचालनासाठी आंतर सभागृह (Indoor Hall) पर्यायी व्यवस्था म्हणून तयार ठेवावे, तसेच कवायत संचालनावेळी ऐनवेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी जनरेटर वा इतर सुविधा पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध ठेवावी.

१९. प्रस्तुत कार्यक्रम “राष्ट्र प्रथम” संकल्पनेवर आधारित असल्याने राज्यातील १ लाखाचे वर शाळांमध्ये, ७ लाखांपेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत व सुमारे २ कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांव्दारा आयोजित केला जाणार असल्याने यास जागतिक विक्रम (World Record) स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी.

उपरोक्त सूचनांप्रमाणे आपल्या अधिनस्त शाळांकडून प्रत्येक वर्षांचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल यासंदर्भात संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण निरीक्षक यांनी दक्षता घ्यावी. उपरोक्त संदर्भीय पत्रांच्या प्रती सोबत जोडल्या आहेत.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

त्यानुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभियान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्या स्तरावरुन पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.

Related posts:

Leave a Comment