सन २०२६-२७ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशाबाबत right to education online application 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२६-२७ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशाबाबत right to education online application 

संदर्भ :

– १) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९.

२) शासन निर्णय क्र. आरटीई-२०२५/प्र.क्र./०८/एसडी-१, दि. १२-०२-२०२६

३) संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई२५टक्के/टे-८०१/२०२५/१७२३५१६, दि. १५-०२-२०२६

४) मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल रिट याचिका क्र. १९०८/२०२६ मध्ये पारित आदेश दि. १०-०३-२०२६

५) संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई-८०१/पी.आय.एल./२०२६/४८३८. दि. १०-०३-२०२६

६) मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांचे पी.आय.एल. क्र. १७/२०२६ मध्ये पारित आदेश दि. ११-०३-२०२६.

७) संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई ८०१/पी.आय.एल/२०२६/४८६५, दि. १२-०३-२०२६

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांसाठी खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत शिक्षणाची तरतुद आहे.

संचालनालयाचे संदर्भ क्र. ०३ च्या पत्रान्वये आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ०१ कि.मी. पर्यंतच्या अंतरावतील शाळा निवडण्याचे स्वातंत्रय पालकांना देण्यात आलेले होते. तथापि मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल पी.आय.एल. क्र. १७/२०२६ मध्ये मा. न्यायालयाने नोंदविलेल्या निरिक्षणानुसार आरटीई २५ टक्के प्रवेश जर ०१ कि. मी. अंतरावर शाळा उपलब्ध नसेल तर मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाही.

त्यानुषंगाने आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून अंतराची अट शिथिल करुन शाळा दर्शविणेबाबत संगणक प्रणालीवर सुविधा देण्यात यावी. दि. १६-०३-२०२६ पर्यंत ज्या पालकांनी आरटीई २५ टक्के ऑनलाईन अर्ज भरलेले आहे असे सर्व अर्ज Unconfirm करणेबाबत पालकांना सुविधा देण्यात यावी तसेच पोर्टलवर ते पुनश्च Confirm करणेबाबत Popup Window दर्शविण्यात यावे.

तरी आपणास कळविण्यात येते की, आरटीई २५ टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख दि. १८-०३-२०२६ होती त्याऐवजी बुधवार, दि. २५-०३-२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

Related posts:

Leave a Comment