माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती देण्याबाबत right to information
संदर्भ : माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन अर्ज, क्र. GADEP/R /२०२५/६२२१६, दि.२३.०९.२०२५
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार आपला उपरोक्त दि.२३.०९.२०२५ रोजीचा अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे या कार्यासनास प्राप्त झाला आहे.
२. संदर्भाधीन अर्जान्वये मागविण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी विभागांकडून मागणीपत्र मागविण्याची कार्यवाही सुरू आहे त्यामुळे सद्यः स्थितीत माहिती उपलब्ध करून देता येणार नाही. तसेच, महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा गट क या परीक्षेबाबतचा विषय या कार्यासनाच्या अखत्यारित येत नाही. सदर माहितीसाठी संबंधित विभागाकडे स्वतंत्र अर्ज करावा,
३. उपरोक्त माहितीने आपले समाधान न झाल्यास सदर पत्र मिळाल्यापासून ३० दिवसांच्या मुदतीत अवर सचिव तथा प्रथम अपीलीय अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, दालन क्रमांक ७२८, सातवा मजला मंत्रालय विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ यांच्याकडे अपील करता येईल.











