सन 2025-26 च्या संच मान्यतांबाबत sanchamanyata paripatrak

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन 2025-26 च्या संच मान्यतांबाबत sanchamanyata paripatrak 

संदर्भ :- 1. शासन निर्णय दिनांक 15.03.2024

2. शासन पत्र दिनांक 21.02.2025 व दिनांक 26.03.2025

3. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांची राज्यस्तरीय आढावा बैठक दि.30.05.2025

4. एनआयसी पुणे यांचे समवेत बैठक दिनांक 13.08.2025 व दि.14.08.2025

5. शासन पत्र क्र. एसएसएन-2015/(प्र.क्र.16/15)/ टीएनटी-2, दि.14.10.2025

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, मा. प्रधान सचिव, (शालेय शिक्षण विभाग) यांच्या राज्यस्तरीय आढावा बैठक दि.30.05.2025 रोजी सरल पोर्टलचे एकत्रिकरणांतर्गत सरल प्रणाली व यु-डायस प्लस प्रणालीचे एकत्रिकरणाबाबत प्राप्त निर्देशानुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रणालीमध्ये यू-डायस प्लस वरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्याची कार्यवाही सुरु आहे.

शासन पत्र दि.14.10.2025 अन्वये प्राप्त निर्देशानुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात दि.20.10.2025 रोजी यु-डायस प्लस पोर्टलवर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीच्या आधारे सन 2025-26 च्या संच मान्यता जनरेट करतेवेळी शा.नि.दि. 25,08,2025 अन्वये अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांच्या व्यवस्थापनामध्ये स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टलवर व्यवस्थापन बदल करणे आवश्यक आहे.

त्यानुषंगाने स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टलवर सदर शाळांच्या व्यवस्थापनाबाबतची कार्यवाही आठ दिवसात करण्यात यावी. शासन निर्णय दि.25.08.2025 अन्वये अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांच्या व्यवस्थापनाबाबतची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण न झाल्यास सदर शाळांच्या सन 2025-26 च्या संच मान्यता दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment