विज्ञान महर्षी महान वैज्ञानिक “डॉ.रघुनाथ अनंत माशेलकर” scientist do Raghunath Mashalkar 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विज्ञान महर्षी महान वैज्ञानिक “डॉ.रघुनाथ अनंत माशेलकर” scientist do Raghunath Mashalkar

अनेकांचे प्रेरणास्थान

(१ जानेवारी, १९४३)

जगातील ४२ विद्यापीठांतून गौरविलेले नाव म्हणजे डॉ. रघुनाथ माशेलकर. शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, मानवतावादी विचारांचे डॉ. माशेलकर हे महाराष्ट्र भूषण व देश-विदेशांत गौरविलेलं नाव म्हणजे डॉ. रघुनाथ माशेलकर हे ‘विज्ञान महर्षी’ म्हणून ओळखले जातात. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १९९१ ‘प‌द्मश्री’, २००० ‘पदमभूषण’, २००५ मध्ये ‘स्टार ऑफ अवार्ड बिजिंग’, २०१४ ‘पद्मविभूषण’ भारतातील तरुणांमध्ये जागतिक स्पर्धेत आपण यशस्वी होऊ असा आत्मविश्वास त्यांनी जागृत केला. जागतिकीकरण या देशाला योग्य की अयोग्य असा एक महत्त्वाचा प्रश्न होता. डॉ. माशेलकरांनी दहा हजार तरुणांमध्ये आत्मविश्वास जागा करून त्यांना मार्ग शोधून दिला. नवे अर्थिक धोरण आल्यावर सारे भारतीय पराभूत मनोवृत्तीने त्यात उतरत आहेत किंवा दबलेल्या मानसिकतेत असताना, त्यांनी उपलब्ध साधनांचा वापर करून देशातील दहा हजार शास्त्रज्ञांची अशी एक फळी तयार केली. त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या येण्याचे एका चांगल्या संधीत रूपांतर केले. ते केंद्रीय औदयोगिक आणि विज्ञान संशोधन मंडळाचे संचालक आहेत. देशातील चाळीस विज्ञान संस्था आणि ऐंशी औद्योगिक संशोधन संस्था यांचे ते प्रमुख आहेत. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे ते संचालक होते.

वैज्ञानिक प्रगतीबरोबर सर्वच विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रांतील समस्यांची त्यांना जाण आहे. सव्वाशे प्रयोगशाळा चालविण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे आहे. बालपणी अतिशय खडतर परिस्थितीत डॉ. माशेलकर यांनी शिक्षण घेतले. त्यात त्यांच्या आईचा कष्टाचा आणि प्रोत्साहनाचा फार मोठा वाटा आहे. शाळेतील स्कॉलरशीप परीक्षेला बसताना त्या काळी उत्तरपत्रिकेचे पैसे भरावे लागत. ते पैसे भरायलाही त्यांच्या आईला जास्तीचे काम करावे लागले होते. डॉ. माशेलकर गोव्यामध्ये ‘माशेल’ या छोट्याशा गावात राहत होते. ६ वर्षांचे असताना त्यांचे वडील स्वर्गवासी झाले. आई कामाच्या शोधात मुंबईला आली. ते १२ वर्षांपर्यंत अनवाणी पायानेच चालत होते. इतकी त्यांची गरीब परिस्थिती होती. चौपाटीवर ते दिव्याखाली बसून अभ्यास करत. मुंबई सेंट्रल स्टेशनला प्लॅटफॉर्मवर बसूनही त्यांनी अभ्यास केला. ‘जंजिरा मोटर वर्क’ सिमेंटच्या बेंचवर बसून काम केले. अभ्यासाचा झरा अंतःकरणातून वाहत असला तरी कुठल्याही सुखसुविधेची गरज नसते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. माशेलकर, ते मुंबईला महानगरपालिकेच्या मराठी शाळेत सातवीपर्यंत शिकले. तिथे ८८% गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले. आठवीत युनियन स्कूलमध्ये गेले. गरीब शाळेत श्रीमंत

शिक्षक मिळावे, असे त्यांना भावे सर भेटले ! ‘पाहा आणि शिका’ अशा प्रकारे विदद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत साबण कसा तयार करतात? आगपेटी कशी तयार करतात? हे वर्गात शिकविण्यापेक्षा ते विद्यार्थ्यांना घेऊन कारखान्यांना भेटी देत असत. भावेसर शास्त्र विषय शिकवत असत. माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे असते. बहिर्गोल भिंगाचा प्रयोग शिकवत असताना त्यावर सूर्याची किरणे पडल्यावर प्रकाशाचा प्रचंड बिंदू तयार होतो. भावे सरांनी कागद जाळला रघुनाथकडे पाहून सर म्ह‌णाले “सर्व शक्ती एकवटल्यावर अचाट कार्य घडते.” तेव्हाच डॉ. माशेलकरांनी ठरवून टाकले की आपण शास्त्रज्ञ व्हायचे…!!

शिक्षणासाठी पैशांची अडचण आली होतीच. ते पार करून त्यांनी केमिकल इंजिनिअरची पदवी मिळवली. माणसातील माणूसपण जागे करून त्याला राष्ट्र उभारणीच्या कामात तयार करणे ही सोपी गोष्ट नाही. डॉ. माशेलकरांच्या यूडीसीटीचे त्या वेळचे संचालक डॉ. एम. एम. शर्मा आणि सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. सी. एन. आर. राव यांनी माशेलकरांना घडवले. हाती आलेल्या संधीचे, देशाला उपयोगी पडणाऱ्या संधीत रूपांतर करणे याचे बाळकडू दिले. आपल्या गुरुजनांचे कार्य विस्तारून पुढे नेण्याचे काम माशेलकरांनी केले. भारतात प्रयोगशाळेतील कामाला त्यांनी नवी दृष्टी दिली. भाषणापेक्षा कृतीला जास्त महत्त्व दिले. प्रयोगशाळेतील संशोधन जागतिक स्तरावर पोहोचवून त्याचा परिणाम बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. डॉ माशेलकर म्हणतात, “आपल्या वीस वर्षांपूर्वी अमेरिकेने सुपर कॉम्प्युटर नाकारला, भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या शेतीच्या कामासाठी हवामान व्यक्त करण्यासाठी संगणक गरजेचा होता. ते आव्हान ‘सी डॅक’ने डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली स्वीकारले. त्यातून ‘परम ८०००’ हा महासंगणक तयार झाला. नंतर तो जर्मनी, ब्रिटन, रशिया यांना निर्यातही करण्यात आला. त्यावर ‘न्यूयॉर्क टाईम्स’ ने म्हटले होते. ‘भारत काय करू शकतो, हे भारताने दाखवले आहे.’ अनेक राष्ट्रीय समित्यांवर डॉ. माशेलकरांनी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. वाहन प्रदूषण, औषधातील ‘मेसळ यांवर त्यांनी बरेच उपाय सुचवले आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजांचा दर्जा ‘आय.आय.टी. दर्जापर्यंत कसा नेता येईल, यासाठी त्यांनी अहवाल तयार केला आहे. डॉ. माशेलकर हे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक झाल्यापासून त्यांची ९५ पेटंट नोंदवली गेली आहेत. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळाचे संचालक झाल्यावर मंडळाच्या प्राप्तीत सव्वाशे कोर्टीची भर पडली. डॉ. माशेलकरांना रॉयल सोसायटीचे सन्माननीय सदस्यत्व मिळाले आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल अॅकेडमी ऑफ इंजिनिअरिंगचे’ ही ते सन्माननीय सदस्य आहेत. ते सतत कार्यामग्न असतात. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. आपला देश वैज्ञानिक क्षेत्रात चांगले कार्य करीत आहे, एका मुलाखतीत ते म्हणाले होते, “भारतीय वैज्ञानिकांनी केलेले कार्य फार मोलाचे, अत्यंत उत्तुंग असे कार्य म्हणता येईल.” कोरोना काळात पुण्यात भारत बायोटिक्स कंपनीने ‘को व्हॅस्कीन’ लस तयार केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. आज विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात आपला देश अग्रेसर आहे.

केवळ जगणे जीवन नाही

मूल्य असावे तुल्यही व्हावे

पूर्णत्वाची ओढ असावी

कर्तृत्वाची साथ घडावी

सातत्याने प्रयत्न करता

पुलकित होई

प्रतिभा आणि प्रतिमा!

या वैशाली सामंत यांनी गायलेल्या गीताप्रमाणे जीवन अर्थपूर्ण व सुदंर होऊ शकते. हेच डॉ. माशेलकरांसारख्या थोर व्यक्तींकडून आपल्याला स्मरते.

Related posts:

1 thought on “विज्ञान महर्षी महान वैज्ञानिक “डॉ.रघुनाथ अनंत माशेलकर” scientist do Raghunath Mashalkar ”

  1. Pingback: as - Dainik Exam

Leave a Comment