प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) एप्रिल -2026 च्या प्रसिध्दीपत्रकास प्रसिध्दी मिळणेबाबत scolarship exam
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) एप्रिल – 2026 च्या प्रसिध्दीपत्रकास प्रसिध्दी मिळणेबाबत…
परीक्षेचे प्रसिद्धीपत्रक येथे पहा pdf download
महोदय,
उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) दि. 26 एप्रिल, 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर अधिसूचनेस राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे. सोबत :- अधिसूचना










