इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध प्रसिध्दीपत्रक scolarship exam hall ticket
संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अधिसूचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2025-26/6321, दि. 30/12/2025
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) ही दि. 26/04/2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दि. 27/03/2026 रोजी सायं 05:00 वाजता संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.









