पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी)-2026 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबत मुद्देनिहाय सूचना scolarship exam online application
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (PUP) परीक्षा (इयत्ता 5 वी) – 2026 ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याबाबत मुद्देनिहाय सूचना
ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याबाबत मुद्देनिहाय सूचना (शाळेने विद्याथ्यांची माहिती जनरल रजिस्टरमधील नादगीप्रमाण अचुकपणे भरावी.)
1) सर्वसाधारण सूचना :-
शाळा नोंदणी प्रपत्र भरल्यानंतर आपणास विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र उपलब्ध होतील.
लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवरील डाव्या बाजूस असलेल्या Std. 5″ (PIP) या बटनावर क्लिक करावे,
त्यानंतर आपणास Registration व Fee Payment हे दोन पर्याय दिसतील,
Registration या बटनावर क्लिक केल्यानंतर आपणास ऑनलाईन आवेदनपत्र उपलब्ध होईल.
2) विद्यार्थी आवेदनपत्र क्रमांक (Student Application Number) –
प्रत्येक आवेदनपत्रास स्वतंत्ररीत्या विद्यार्थी आवेदनपत्र क्रमांक सिस्टिमव्दारे जनरेट होईल,
3) फोटो (Photo) –
प्रत्येक विद्यार्थ्यांचा फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे अनिवार्य आहे. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करुन जतन करुन ठेवावेत.
विद्याथ्यांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपध्दती 8.5 से.मी. X 4.5 से. मी. आकाराच्या पांढऱ्या कागदावर रंगीत फोटो चिकटवून त्याखाली काळया शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरचा फोटो व स्वाक्षरी स्कॅन करावी.
फोटो व स्वाक्षरी JPG, JPEG किंवा PNG या फॉरमॅटमध्ये सेव्ह करावा.
फोटो व स्वाक्षरीच्या फाईलची साईज 100 kb पेक्षा जास्त नसावी.
4) विद्यार्थ्यांचे नाव (Student Name) –
आडनाव (Last Name) इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करा.
प्रथम नाव (First Name) इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करा.
वडीलांचे नाव (Father’s Name) इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करा.
आईचे नाव (Mother’s Name) इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करा.
इंग्रजी कॅपिटल लेटर्स शिवाय इतर कोणतीही लिपी (देवनागरी मराठी हिंदी, इ) वापरु नये.
5) लिंग (Gender) –
MALE / FEMALE या पैको उत्चूक पर्याय निवडा.
6) दिव्यांग आहे का? (Are you Differently abled ?) –
Yes / No या पैकी अचूक पर्याय निवडा.
आहे पर्याय निवडल्यास लेखनिक आवश्यक आहे का? (Do you need a writer for Exam?) असा प्रश्न स्क्रीनवर उपलब्ध होईल.
लेखनिक हवा असल्यास Yes हा पर्याय निवडा, नको असल्यास No हा पर्याय निवडा.
लेखनिकास आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची परीक्षेपूर्वी किमान 8 दिवस अगोदर मान्यता घ्यावी,
7) जन्म दिनांक (Date of Birth)-
शाळेच्या जनरल रजिस्टर / दाखलखारीज रजिस्टरमधील रेकॉर्डप्रमाणे Day. Month, Year या स्वरुपात संबंधित रकान्यात विद्यार्थ्यांची जन्मतारीख नोंदवा. (ड्रॉप डाऊन लिस्टमधून दिवस, महिना, वर्ष निवडा.)
कमाल वयोमर्यादा –
▶ विद्यार्थ्यांचे वय परिक्षेस बसण्याच्या कमाल विहित वयोमर्यादपेक्षा जास्त असल्यास स्क्रीनवर ‘विद्यार्थ्यांचे वय विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त आहे, तरीही विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ठ होता येईल परंतु त्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.’ असा संदेश दिसेल
> विहित कमाल वयोमर्यादपेक्षा अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्र भरता येईल तसेच परीक्षेस प्रविष्ट होता येईल. मात्र अशा विद्याध्यर्थ्यांना परीक्षेत कटऑफ इतके अथवा कट ऑफ पेक्षा अधिक शेकडा गुण मिळाले तरीही त्यांना शिष्यवृत्ती अर्हताधारक घोषित केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
8) महाराष्ट्राचा रहिवासी आहे का ? (Are you domicile of Maharashtra?) –
Yes / No या पैकी अचूक पर्याय निवडा.
9) आधार कार्ड क्रमांक (Aadhaar No.) किंवा आधार नोंदणी क्रमांक (Aadhaar Enrollment No.) –
विद्यार्थ्यास आधार कार्ड मिळाले असल्यास त्यावरील 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाईप करावा
विद्याथ्यांस आधार कार्ड मिळाले नसल्यास आधार नोंदणी रिसीटवरील 14 अंकी आधार एन्रॉलमेंट क्रमांक टाईप करावा.
विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यासाठी आचार कार्ड क्रमांक किंवा आधार एन्रॉलमेंट क्रमांक असणे अनिवार्य आहे.
10) आरक्षणाचा प्रवर्ग (Reservation Category) –
शाळेच्या जनरल रजिस्टर / दाखलखारीज रजिस्टरमधील नोंदीप्रमाणं जातीनुसार विद्यार्थ्यांच्या आरक्षणाचा प्रवर्ग ड्रॉपडाऊन लिस्टमधून अचूकपणे निवडा. (ड्रॉप डाऊन लिस्ट खुला (GEN), अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती अ (VJ-A). भटक्या जमाती व (NT-B), भटक्या जमाती क (NT-C), भटक्या जमाती ड (NT-D). इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC))
विशेष सुचना –
महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या (MSCERT) शाळेतील SC, ST, VJ-A, NT-B, NT-C, NT-D या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली असून, ही सवलत CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रमांच्या शाळातील मागासवगीय विद्यार्थ्यांना लागू नाही.
कोणताही अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील उर्वरित SBC, OBC, OPEN या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क पुर्ण भरावे लागेल.
चुकीचा आरक्षण प्रवर्ग नोंदविल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील. अशा मुख्याध्यापकाविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात येईल.
महाराष्ट्र शासनाच्या (MSCERT) अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील मागासवर्गीय (SC, ST. VJ-A, NT-B, NT-C, NT-D) या प्रवर्गातील विद्याध्यांचा H आणि । शिष्यवृत्ती संचासाठी गुणवत्तेनुसार विचार केला जातो. म्हणून आरक्षण प्रवर्ग अचूक नोंदविणे आवश्यक आहे.
11) परीक्षेचे माध्यम (Medium for Examination) –
शाळा माहिती प्रपत्र भरतेवेळी निवडलेली माध्यमे ऑनलाईन आवेदनपत्रात उपलब्ध होतील.
उपलब्ध असलेल्या माध्यमांपैकी विद्याथी ज्या माध्यमातून परीक्षेस प्रविष्ट होणार आहे ते माध्यम निवडा.
सेमी इंग्रजी माध्यम निवडल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर क्र.। मधील गणित या विषयाची व पेपर क्र. 2 मधील बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशा दोन्हीही माध्यमांतून मिळेल व त्यानुसार गुणदान करण्यात येईल,
12) विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम (Student’s Curriculum) –
शाळा माहिती प्रपत्र भरतेवेळी शाळेने जो जे अभ्यासक्रम निवडला/ले होता होते, तो/ते अभ्यासक्रम स्क्रीनवर उपलब्ध होईल होतील.
त्यापैकी विद्यार्थी सध्या शाळेत शिकत असलेला अभ्यासक्रम अचूकपणे निवडा.
विशेष सूचना-
महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमात (MSCERT) शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीसाठी विचार केला जातो.
चुकीचा अभ्यासक्रम नोंदविल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीस अपात्र ठरल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील. अशा मुख्याध्यापकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात येईल.
13) वडीलांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न (Father’s / Parent’s Annual Income) –
पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.1,00,000/- (एक लाख रुपये) पेक्षा कमी किया रु.1,00,000/-(एक लाख रुपये) पेक्षा जास्त यापैकी अचूक पर्याय निवडा.
संबंधित विद्यार्थ्यांकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र नसल्यास वार्षिक उत्पन्न रु.1,00,000/- (एक लाख रुपये) पेक्षा कमी हा पर्याय निवडू नये.
संबंधित विद्याथ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.1,00,000/- (एक लाख रुपये) पेक्षा कमी असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे (तलाठी तहसीलदार प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावरुन तपासणी करणे बंधनकारक असून सदर प्रमाणपत्र आपल्या दप्तरी जतन करुन ठेवावे व परिषदेने मागणी केल्यास उपलब्ध करुन द्यावे.
विदर्भातील 11 जिल्ह्यांकरीता राखीव असलेल्या व G या शिष्यवृत्ती संचासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.1,00,000/- (एक लाख रुपये) पेक्षा कमी असलेल्या विद्याध्यर्थ्यांचा गुणवत्तेनुसार विचार केला जाईल.
14) पालकाचा मोबाईल क्रमांक (Parent’s Mobile No.) –
या रकान्यामध्ये विद्यार्थ्याच्या पालकांचा मोबाईल क्रमांक उपलब्ध असल्यास नमूद करावा. मात्र
अनिवार्य असणार नाही.
15) पालकाचा ईमेल आय.डी. (Parent’s Email ID.) –
या रकान्यामध्ये विद्यार्थ्याच्या पालकांचा ईमेल आय, डी. उपलब्ध असल्यास नमुद करावा, मात्र अनिवार्य असणार नाही.
16) आदिवासी क्षेत्रातील आदिवासी (Are you a tribal from Tribal Sub Plan (T.S.P.) area?) –
हा पर्याय आदिवासी विद्यानिकेतन प्रवेशाबाबत आहे.
विद्यार्थी शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी क्षेत्रातील आदिवासी (S.T.) असल्यास YES हा पर्याय निवडावा, आदिवासो क्षेत्रातील नसल्यास NO हा पर्याय निवडावा.
याबाबत अधिक माहितीसाठी आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक टि. एस. पी. 1086/8710/प्र.क्र.31/का-5, दि. 9 मार्च, 1990 पहावा.
17) विद्यानिकेतन प्रवेश (Admission To Public School) –
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसमवेत शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. पुढीलपैकी आवश्यक / लागू असलेल्या विद्यानिकेतन प्रवेशाबाबत योग्य ते पर्याय निवडा,
17.1) शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का? –
प्रवेश हवा असल्यास “YES” हा पर्याय निवडावा, नको असल्यास “NO” हा पर्याय निवडावा.
अटी-
* ग्रामीण क्षेत्रातील शासनमान्य शाळेत इ.5 वी मध्ये शिकणारा विद्यार्थी प्रवेश परीक्षेस बसू शकतो.
* या विद्यानिकेतनमध्ये केवळ मुलांनाच प्रवेश आहे. (मुलींना प्रवेश नाही).
* फक्त मराठी किंवा सेमी मराठी (मराठी इंग्रजी) माध्यमातील असावा.
* वरील अटींची पुर्तता होत असल्यासच या मुहयाचा पर्याय Active राहील,
* वरील अटीत विद्यार्थी बसत नसल्यास या मुद्दयाचा पर्याय Deactive राहील,
17.2) आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का ?-
प्रवेश हवा असल्यास “YES” हा पर्याय निवडावा, नको असल्यास “NO” हा पर्याय निवडावा.
अटी-
* विद्यार्थी शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील रहिवासी असावा.
* तो अनुसूचित जमातीतील (S.T.) असावा.
* या विद्यानिकेतनमध्ये केवळ मुलांना प्रवेश आहे. (मुलींना प्रवेश नाही).
* फक्त मराठी किवा सेमी मराठी (मराठी इंग्रजी) माध्यमातील असावा,
* वरील अटींची पुर्तता होत असल्यासच या मुद्द्याचा पर्याय Active राहील,
* वरील अटीत विद्याथी बसत नसल्यास या मुद्दयाचा पर्याय Deactive राहील,
17.3) विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का?-
प्रवेश हवा असल्यास “YES” हा पर्याय निवडावा, नको असल्यास “NO” हा पर्याय निवडावा.
अटी-
* राज्य शासनाच्या समाजकल्याण खात्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळेतील इ. 5 वीत शिकणारा विद्यार्थी असावा.
* या विद्यानिकेतनमध्ये दोहोंना (मुलगा व मुलगी) प्रवेश आहे.
* फक्त मराठी किंवा सेमी मराठी (मराठी इंग्रजी) माध्यमातील असावा,
* वरील अटींची पुर्तता होत असल्यासच या मुद्दयाचा पर्याय Active राहील.
*वरोल अटीत विद्यार्थी बसत नसल्यास या मुद्दयाचा पर्याय Deactive राहील,
18) शुल्क (Fee) –
शासन निर्णय क्र. प्राडशि/प्र.क्र.23/2025(ई-1142170)/एसडी-5, 17/10/2025 व कार्यकारी समिती सभा क्र. 29, दि. 12/04/2018, ठराव क्र. 470 नुसार दर पुढीलप्रमाणे आहेत
ऑनलाईन आवेदनपत्रात प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क, विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क, अति विशेष विलंब शुल्क एकुण शुल्क आपोआप गणले जाऊन संबंधित चौकटीत नोंदविले जाईल.
विशेष सुचना -प्रवेश शुल्क रु.50/- सर्व विद्यार्थ्यांना (मागासवर्गीय, बिगर मागासवर्गीय व दिव्यांग)
लागू आहे.
परीक्षा शुल्क –
महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणान्या (MSCERT) शाळेतील SC, ST, VJ-A NT-B, NT-C, NT-D या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली असून, ही सवलत CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रर्माच्या शाळातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही.
सर्व अभ्यासक्रमांच्या शाळेतील दिव्यांग विद्याथ्यर्थ्यांसाठी सुध्दा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे.
उर्वरित SBC, OBC, OPEN या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागेल,
19) बँक खात्याची माहिती (Bank Details) –
यामध्ये विद्याथ्यांची बैंक खात्याची माहिती भरावी.
विद्यार्थ्यांचे बैंक खाते क्रमांक उपलब्ध नसल्यास विद्यार्थ्याच्या आधारकार्डशी संलग्न असलेले विद्यार्थ्यांचे आई, वडील किंवा पालक यांच्या सोबतच्या संयुक्त बैंक खात्याची माहिती (विद्यार्थ्यांशी नाते, बँकेचे नाव, IFS Code व बैंक खाते क्रमांक) भरावी.
बँक खात्याचा तपशील अनिवार्य नसल्याने त्याबाबत विद्यार्थी पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये. केवळ सदर माहिती उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
20) महत्त्वाचे –
उपरोक्तनुसार ऑनलाईन आवेदनपत्रातील सर्व माहिती भरल्यानंतर Save & Preview या बटनावर क्लिक करावे
आपणास विद्यार्थ्यांचे ऑनलाईन भरलेले आवेदनपत्र स्क्रिनवर दिसेल.
ऑनलाईन आवेदनपत्रात काही दुरुस्ती करावयाची असल्यास Edit या बटनावर क्लिक करुन दुरुस्ती करता येईल.
ऑनलाइन आवेदनपत्रात भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करुन Submit या बटनावर क्लिक करावे
Dashboard मध्ये आपल्या शाळेच्या ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी Pending Payment Student List मध्ये दिसेल.
21) Fee Payment-
डॅशबोर्डवरील डाव्या बाजूस असलेल्या Std. 5 (PUP) यामधील Fee Payment या बटनावर क्लिक करावे.
क्लिक केल्यानंतर आपणास Pending Payment Student List मध्ये आवेदनपत्र भरलेल्या सर्व विद्याथ्यांची एकत्रित यादी दिसेल, सदर यादीतील एखाद्या विद्याथ्यर्थ्यांचे शुल्क आपणास भरावयाचे नसल्यास त्या विद्यार्थ्यांच्या नावासमोरोल चेकबॉक्स वर क्लिक करुन Deselect करावे.
त्यानंतर स्क्रीनवरील उजव्या बाजूस असणाऱ्या MAKE PAYMENT या बटनावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर Payment Gateway चे पेज स्क्रिनवर दिसेल, त्यावरील योग्य त्या पर्यायाची निवड करुन आवश्यक माहिती भरावी व MAKE PAYMENT या बटनावर क्लिक करुन प्रक्रिया पूर्ण करावी.
त्यानंतर आपणास भरलेल्या शुल्काची ऑनलाईन रिसीट प्राप्त होईल. ती आपल्या दप्तरी जतन करुन ठेवावी.
ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या विद्याथ्यांचे शुल्क भरल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची नावे Successfully Registered Student List मध्ये दिसतील व सदर विद्यार्थ्यांच्या Registration थी प्रक्रिया पूर्ण होईल.
Successfully Registered Student List मध्ये दिसणारे विद्यार्थीच परीक्षेस पात्र ठरतील.
परीक्षा शुल्क भरल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्याथ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रात कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही,










