इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता बहुपर्यायी प्रश्नसंच scolarship exam question bank

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता बहुपर्यायी प्रश्नसंच scolarship exam question bank

1. जसा ‘पक्षी’ चा संबंध ‘आकाश’ शी आहे. तसा ‘मासा’ चा संबंध असेल?

1. घरटा

2. झाड

3. पाणी

4. जमीन

2. खालील अक्षरमालेत गाळलेल्या जागी योग्य अक्षरे निवडा.

A, C, E, G?

1. B

2. D

3. H

4.1

3. एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 15 वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

1.20

2.26

3.29

4. 31

4. जसा ‘पुस्तका’चा संबंध ‘लेखका’शी आहे, तसा ‘चित्रा’चा संबंध कशाशी असेल?

1. गायक

2. लेखक

3. कवी

4. चित्रकार

5. अमोल पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तो डावीकडे काटकोनात वळल्यास त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

1. दक्षिण

2. उत्तर

3. पूर्व

4. पश्चिम

6. गटात न बसणारा महिना ओळखा जानेवारी, मार्च, एप्रिल, मे

1. जानेवारी

2. मार्च

3. एप्रिल

4. मे

7. खालीलपैकी कोणती लीप वर्ष आहे?

1. 2010

2.2014

3. 2015

4. 2016

8. घराच्या खिडकीतून बाहेर पाहिल्यास सूर्य मावळताना दिसत आहे, तर खिडकी कोणत्या दिशेला असावी?

1. पूर्व

2. पश्चिम

3. दक्षिण

4. उत्तर

9. विसंगत पर्याय निवडा: पेन, पेन्सिल, खडू, कागद

1. पेन

2. पेन्सिल

3. खडू

4. कागद

10. 1 जानेवारीला गुरूवार आहे तर, 14 जानेवारी कोणता वार असेल?

1. मंगळवार

2. बुधवार

3. गुरूवार

4. शुक्रवार

11. सहसंबंध ओळखा. पाणी तहान अन्न: ?

1. भूक

2. पोट

3. जेवण

4. भाजी

12. दररोज राष्ट्रगीत म्हटले पाहिजे कारण

1. त्यामुळे स्मरणशक्ती वाढते.

2. त्यामुळे गायक बनता येते.

3. त्यामुळे राष्ट्राभिमान वाढतो.

4. त्यामुळे राष्ट्र मोठे होते.

13. घरासमोर एक कडूलिंबाचे झाड लावले तर तुम्ही काय कराल?

1. झाडाचे येता जाता पाने तोडील

2. झाडाची सर्वप्रकारची काळजी घेईल.

3. जमीनीतून झाड उपटून फेकून देईल.

4. झाडाकडे दुर्लक्ष करीन

14. राजूला चार काका आहेत. त्याचा एक काका शिक्षक आहेत. तर शिक्षक काकांना किती भाऊ आहेत?

1. दोन

2. तीन

3. चार

4. पाच

15. जर पांढऱ्याला काळा म्हटले, काळ्याला लाल म्हटले आणि लालला निळा म्हटले, तर रक्ताचा रंग कोणता असेल?

1. निळा

2. काळा

3. लाल

4. पांढरा

16. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 1, 8, 27,?

1.36

2.45

3.64

4.81

17. रिकाम्या जागी योग्य पर्याय भराः पाय मोजे :: हात?

1. अंगठी

2. घडी

3. बांगडी

4. हातमोजे

18. एका संख्येचे 40% = 80, तर संख्या कोणती?

1. 160

2. 180

3. 200

4. 240

19. वेगळा शब्द ओळखा. डोळा, कान, नाक, मेंदू

1. डोळा

2. कान

3. नाक

4. मेंदू

20. जर सोमवार = 1, मंगळवार 2, तर रविवार = —–?

1.7

2.6

3.5

4.3

Related posts:

Leave a Comment