इ.४ थी, इ. ५ वी, इ. ७ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्जामध्ये EWS व SEBC आरक्षण प्रवर्ग समाविष्ठ करणेबाबत scolarship online exam
संदर्भ: आपलेकडील पत्र क्र.जा.क्र. अशिसं/महाराष्ट्र राज्य/०२/२०२६, दि.२३.०१.२०२६.
उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार आवेदन पत्र भरतांना उपलब्ध करून दिलेल्या आरक्षण प्रवर्ग dropdown यादीत EWS व SEBC हा प्रवर्ग समाविष्ठ करण्यात यावा असे नमूद केले आहे.
राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहित करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ गाभा आहे. राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे. शिष्यवृत्ती मिळविणे ही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गरीब, होतकरू, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन १९५४-५५ पासून कार्यान्वित असून त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.
शासन निर्णय दि. 17. 10. 2025 नुसार सन 2025-2026 या शैक्षणिक सत्रात एक वेळची बाब म्हणून इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन (अंतिमतः) तसेच इ. ४ थी व इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी तसेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ४ थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ७ वी साठी सदर शासन निर्णयानुसार जे जिल्हा निहाय, तालुकानिहाय व प्रकारनिहाय शिष्यवृत्ती संच मंजूर करण्यात आले आहेत त्याप्रमाणे आवश्यक त्या बाबींचा समावेश करून इ. ४ थी, इ. ५.वी, इ. ७ वी व इ. ८ वी साठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरणेसाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासन निर्णय दि 17.10.2025 नुसार एकूण संचापैकी प्रवर्गासाठी उपलब्ध असलेले संच खालील प्रमाणे
1. विदर्भातील 11 जिल्ह्यासाठी राखीव असलेल्या मागासवर्गीय मुले / मुली (H) व मागासवर्गीय मुली (1) संच
2. केवळ इ. 7 वी / इ. 8 वी साठी तालुक्यास्तरीय असलेला ग्रामीण अनुसूचीत जाती (B) व ग्रा. आदिवासी (D) संच
या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रवर्गासाठी संच उपलब्ध नाहीत त्यामुळे EWS व SEBC या प्रवर्गाचा पर्याय आवेदनपत्रात उपलब्ध करून दिलेला नाही अथवा समाविष्ठ करून देता येत नाही.










