शालार्थ क्रमांक नसलेल्या व मानधन तत्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करण्यासाठी अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत (आर्थिक वर्ष २०२५-२६) shalartha mandhan anudan
संदर्भ :- १. वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र. अर्थसं२०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३,
दि. १२ मार्च, २०२६.
प्रस्तावना :-
२. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा दि.२३.०१.२०२६ रोजीचा प्रस्ताव.
राज्यातील अशासकीय माध्यमिक शाळा, अशासकीय अनुदानित सैनिकी शाळा व अशासकीय उच्च माध्यमिक शाळांमध्ये शालार्थ क्रमांक नसलेल्या व मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
अशासकीय माध्यमिक शाळा, अशासकीय अनुदानित सैनिकी शाळा व अशासकीय उच्च माध्यमिक शाळांमध्ये मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी याना शालार्थ क्रमांक नसल्याने सदर कर्मचा-यांचे वेतन अदा करणे प्रलंबित होते. आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता वित्त विभागाने रु. ३००० इतकी लाक्षणिक पूरक मागणी मान्य केली असून सुधारित अंदाजाद्वारे लेखाशिर्ष क्र. २२०२०४४२, २२०२०४६९ व २२०२०४७८ अंतर्गत १० कंत्राटी सेवा या उद्दीष्ठामध्ये एकूण रु.६,३०,१३,०००/-(सहा कोटी तीस लाख तेरा हजार मात्र) इतका निधी उपलब्ध केला आहे..
अशासकीय माध्यमिक शाळा, अशासकीय अनुदानित सैनिकी शाळा व अशासकीय उच्च माध्यमिक शाळांमध्ये शालार्थ क्रमाक नसलेल्या व मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याऱ्यांचे मानधन अदा करण्यासाठी, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात लेखाशिर्ष क्र. २२०२०४४२, २२०२०४६९ व २२०२०४७८ अंतर्गत १० कंत्राटी सेवा या उद्दीष्ठामध्ये एकूण रु. ६,३०,१३,०००/- (सहा कोटी तीस लाख तेरा हजार मात्र) इतका निधी पुढीलप्रमाणे आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना मंजूर व वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
३. यानुसार १० कंत्राटी सेवा अंतर्गत कर्मचाऱ्याऱ्यांचे मानधन ही वेतनसदृश्य बाब असल्याने मानधन तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्याची संख्या, त्यांचा नियुक्ती कालावधी व परिगणित केलेल्या मानधनाची रक्कम अचूक असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी आयुक्त शिक्षण, पुणे याची राहील.
४. उपरोक्तप्रमाणे वितरित करण्यात येत असलेला निधी संबंधितांना वितरित करण्याची दक्षता नियंत्रक अधिकारी तथा आयुक्त शिक्षण, पुणे यांनी घ्यावी.
५. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक २४७/व्यय-५, दिनांक २६/०३/२०२६ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२६०३२७१७२६२८०९२१ हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,







