शाळास्तरावरील विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सुविधेबाबत shaley samiti paripatrak

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळास्तरावरील विविध समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सुविधेबाबत shaley samiti paripatrak

संदर्भ-शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक १६-४-२०२५

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक १६४-२०२५ नुसार शाळास्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून शाळास्तरावर पुढीलप्रमाणे समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१. शाळा व्यवस्थापन समिती

२. सखी सावित्री समिती

३. महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती

४. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकासन समिती

शाळास्तरावरील उपरोक्त समिती अध्यक्षांची माहिती या कार्यालयामार्फत मागविण्यात आली होती, त्यानुसार प्राप्त शाळा स्तरावरील समिती अध्यक्षांची नावे NIC मार्फत सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्यावत करण्यात आलेली असून शाळांना शालेय समिती माहिती या मेनूअंतर्गत जिल्हा, तालुका निवडल्या नंतर शाळांची नावे दिसतील, त्यांनी शाळेच्या नावावर क्लिक केल्यानंतर अपलोड केलेली यादी दिसेल, यादीत नावे योग्य असल्यास बदल करण्याची आवश्यकता नाही.

ज्या शाळांनी वरील माहिती सादर केलेली नाही त्यांना माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्यायावत करण्याची सुविधा मुख्याध्यापक लॉगीन वर उपलब्ध झालेली आहे. याच बरोबर शाळांना वरील माहितीत बदल करण्याची सुविधाही सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर मुख्याध्यापक लॉगीन वर उपलब्ध झालेली आहे.

शासन परिपत्रक pdf download

तरी आपल्या स्तरावरून सर्व शाळांना शाळास्तरावरील समित्यांच्या अध्यक्षांची माहिती सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर अद्ययावत करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्ययाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा.

Related posts:

Leave a Comment