फेब्रुवारी-मार्च २०२६ माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) विद्यार्थ्यांचा APAAR ID नोंदवून घेणेबाबत ssc hsc apaar id 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फेब्रुवारी-मार्च २०२६ माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) विद्यार्थ्यांचा APAAR ID नोंदवून घेणेबाबत ssc hsc apaar id

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ ला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेळी Digilocker मध्ये विद्याथ्यांच्या गुणपत्रिका उपलब्ध करून द्यावयच्या आहेत. त्याकरीता विद्यार्थ्यांच्या APAAR ID ची नोंद आवश्यक आहे. APAAR ID द्वारे प्राप्त Digital गुणपत्रिकांचे विधार्थ्यांना होणारे लाभ पुढील प्रमाणे आहेत.

१. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचे कायमस्वरूपी Digital Record तयार होऊन सर्व शैक्षणिक गुणपत्रिका एकत्रित उपलब्ध होतात

२. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुलभ होते. शैक्षणिक संस्था/ नियोक्ते त्वरीत पात्रता पडताळणी करू शकतात, भौतिक कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाहीशी होते.

३. सरकारी शिष्यवृत्ती व योजनांमध्ये लाभ मिळणे सुलभ होते.

४. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी कोठूनही उपलब्ध होतात.

५. केंद्रीकृत आणि सुरक्षित प्रणालीमुळे कागदपत्रे हरवण्याचा धोका नाही.

शासन परिपत्रक pdf download

त्यामुळे आपल्या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांचा APAAR ID उपलब्ध करून त्याची नोंद मंडळाचे संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर करणेबाबत आपल्या कार्य कक्षेतील सर्व मान्यता प्राप्त शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात यावे व केलेल्या कार्यवाही करण्याबाबत अहवाल राज्य मंडळ कार्यालयात सादर करावा.

Related posts:

Leave a Comment