शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदानास पात्र प्राथमिक शाळा/तुकडयांची तपासणी करणेबाबत tappa anudan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदानास पात्र प्राथमिक शाळा/तुकडयांची तपासणी करणेबाबत tappa anudan 

संदर्भ: १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दिनांक २५/०८/२०२५.

२) संचालनालयाचे पत्र क्र.: प्राशिसं/खाप्राशा/मुल्यांकन/२०२५/४-५०४/०३७४५, दि २९/८/२०२५.

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टामा अनुदान व नव्याने २० टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा, वर्ग/तुकड्या संदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करणेबाबत क्षेत्रिय कार्यालयांना निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच सदर शासन निर्णयानुसार पात्र ठरलेल्या प्राथमिक शाळा व तुकड्यांपैकी सद्यस्थितीत आपले स्तरावर प्रत्यक्ष अनुदान वितरण आदेश दिलेल्या शाळा तुकडया तसेच अनुदान वितरण आदेश न दिलेल्या शाळा व तुकडया याबाबतचा अहवाल संचालनालयास सादर करणेबाबत आपणांस वेळोवेळी कळविण्यात आले आहे. शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील अटी व शर्तीमधील अट क्र. १७ मध्ये पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे.

अट क्र. १७ : दरवर्षी संबंधित शिक्षण संचालक स्तरावरुन या शासन निर्णयातील किमान ५ टक्के शाळांची ईश्वरचिट्ठी पद्धतीने निवड करुन पडताळणीचा स्वंयस्पष्ट अहवाल शासन सादर करणे बंधनकारक राहील.

वरीलप्रमाणे नमूद केल्यानुसार शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील मुद्दा क. अ, ब, क व ड येथे नमूद करण्यात आलेल्या प्राथमिक शाळा व वर्ग/तुकडयांना आपल्या स्तरावरुन पात्र ठरवून अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे अशा प्राथमिक शाळा व वर्ग/तुकडयांची तपासणी करण्याकरीता खालीलप्रमाणे जिल्हानिहाय पथक तयार करण्यात येत आहेत.

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद.

२) उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद,

३) अधीक्षक, सा.रा.से. (प्राथमिक) जिल्हा परिषद,

सदर तपासणी पथकाने त्यांना तपासणी करावयास दिलेल्या जिल्हयातील शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ नुसार २० टक्के, ४० टक्के, ६० टक्के व ८० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक शाळांपैकी ५ टक्के शाळांची व वर्ग/तुकडयांची शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील अटी व शर्तीनुसार सोबत दिलेल्या प्रपत्रात नमूद सर्व बाबींची दिनांक २०/०२/२०२६ ते १८/०३/२०२६ या कालावधीत तपासणी करुन त्यासंदर्भातील आपला स्वंयस्पष्ट अहवाल दिनांक २५/०३/२०२६ पर्यंत संचालनालयास समक्ष सादर करावा.

शासन परिपत्रक pdf download

Related posts:

Leave a Comment