05 सप्टेंबर शिक्षक दिन सूत्रसंचालन चारोळी युक्त जबरदस्त मराठी सूत्रसंचालन teacher’s day anchoring 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

05 सप्टेंबर शिक्षक दिन सूत्रसंचालन चारोळी युक्त जबरदस्त मराठी सूत्रसंचालन teacher’s day anchoring 

5 सप्टेंबर हा शिक्षक दिन होय या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो या दिवशी प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो शिक्षकाचे स्थान गुरुचे आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षक होते त्यांचा सन्मान राष्ट्रपती म्हणून केला गेला त्यामुळे त्यांच्या जन्मदीवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.

शिक्षक दिनाचे सुंदर आणि जबरदस्त सूत्रसंचालन खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे सूत्रसंचालन सुरू करताना

सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम

➡️उपस्थितांचे स्वागत

➡️कार्यक्रमाचे प्रास्ताविक

➡️अध्यक्ष निवड आणि परिचय

➡️उपस्थित मान्यवरांचा परिचय

➡️दीप प्रज्वलन

➡️प्रतिमा पूजन

➡️मान्यवरांचे भाषणे

➡️विद्यार्थ्यांची भाषणे

➡️शिक्षकांची भाषणे

➡️अध्यक्षांची भाषण

➡️आभार प्रदर्शन

शिक्षकांचा सन्मान आणि वंदन कार्यक्रम मुलांची भाषणे मान्यवरांची भाषणे अध्यक्ष भाषण आभार प्रदर्शन आणि वंदे मातरम्

अध्यक्ष निवड

“ज्ञानाचा प्रकाश देती….. यशाची वाट दाखविती…. वर्ण मी किती शिक्षकांची महती…. नतमस्तक होऊया शिक्षकांच्या चरणी… या शुभ दिनी… !!”

सर्वप्रथम माझ्या गुरुजनांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मित्रांनो, आज शिक्षक दिन. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे

” ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा म्हणजे शिक्षक निष्ठा आणि कर्तव्य म्हणजे शिक्षक श्रद्धा, भक्ती आणि शक्ती म्हणजे शिक्षक विश्वास आणि वात्सल्य म्हणजे शिक्षक आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तीमंत प्रतिक म्हणजे शिक्षक…. ”

प्रास्ताविक

सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवर, पालक, ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी माझा मित्र अनुपम यास येथे आमंत्रित करतो.

” जमलो आज आपण शिक्षक दिनाच्या सोहळ्याला नमुन वंदन करितो सर्व गुरुजनांच्या चरणाला कोणाची नजर ना लागो गुरु शिष्याच्या नात्याला… ”

अशा प्रकारे सुरुवात करून आपले प्रास्ताविक पूर्ण करावे. प्रास्ताविकामध्ये शिक्षक दिनाविषयी माहिती सांगावी. तसेच आयोजित संपूर्ण कार्यक्रमाची माहिती द्यावी. आणि सर्व कार्यक्रमाची रूपरेषा सुद्धा सांगावी. यानंतर पुढील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कसे करायचे ते बघूया.

(प्रास्ताविक झाल्यानंतर )

धन्यवाद अनुपम !

आपल्या प्रास्ताविकातून आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आपण स्पष्ट केली. यानंतर आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष स्थान सन्माननीय श्री……………… यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करतो.

अनुमोदन

( तर मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या कार्यक्रमाला जे अध्यक्ष निवडणार आहात त्यांचे नाव घ्यायचे आहे. यानंतर अध्यक्ष निवड साठी खालील प्रकारे अनुमोदन द्यावे. ) आत्ताच माझा मित्र पारस कदम याने केलेल्या अध्यक्ष निवडीला आम्ही सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो.

धन्यवाद. यानंतर आपण आपल्या पुढील कार्यक्रमाकडे वळूया.

दीप प्रज्वलन / प्रतिमा पूजन 

“अज्ञानाची भीती दूर करण्यासाठी मना मनात गुरु प्रेमाचा दीप पेटवूया अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन करूया.”

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री. विकास पुजारे आणि सर्व उपस्थित मान्यवर यांना विनंती करतो, की त्यांनी सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करावे.

( प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन चालू असताना खालील चारोळी म्हणायची आहे.)

“पेटवूया ज्योत ज्ञानाची, आत्मविश्वासाची अन् शिक्षकांच्या सन्मानाची करूया सरस्वती मातेचे पूजन सारे मिळूनी तिच्या चरणी लीन होऊनी !!”

(यानंतर प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर आपण खालील प्रमाणे सूत्रसंचालन करायचे आहे.) धन्यवाद सर. आता मित्रांनो आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया.

“गुरूने नेहमी ज्ञान देत जावे… अन् शिष्याने ते घेत जावे… हे निस्वार्थी देणे – घेणे सतत चालू राहावे… हे गुरु – शिष्याचे नाते जगी अजरामर व्हावे…”

मित्रांनो आजच्या या मंगल प्रसंगी आम्ही सर्व विद्यार्थी आमच्या शिक्षकांचे पूजन करणार आहोत. आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत. मी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की त्यांनी आपले गुरुजनांचे आशीर्वाद घ्यावेत.

(यानंतर सर्व विद्यार्थी शिक्षकांना शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतील.

स्वागत गीत

यावेळी मित्रांनो बॅकग्राऊडला गुरु प्रार्थना लावावी. यूट्यूब वर गुरु प्रार्थना मिळतील. तसेच मित्रांनो या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये जर वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला असेल तर तो घ्यावा.)

(यानंतर पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करायचे ते पाहूया.)

” गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णूः गुरुर्देवो महेश्वराः गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवै नमः || ‘ ”

शिक्षक व विद्यार्थी भाषणे

यानंतर शिक्षक दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात यावीत. त्यासाठी खालील प्रकारे सूत्रसंचालन करावे.

” शिक्षक आहे मान आमचा शिक्षक आहे सन्मान आमचा || शिक्षक आहे आत्मविश्वास आमचा शिक्षक आहे आधार आमचा || मानवंदना देऊनी तयांना गोडवा वाढवूया या पवित्र नात्याचा… ”

मंडळी शिक्षक दिनानिमित्त आमच्या लाडक्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्या शाळेतील छोटी मुले आपल्यासमोर भाषण सादर करत आहेत.

(आणि अशा प्रकारे प्रत्येक मुलाला संधी देऊन आपण मुलांच्या भाषणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांची भाषणे झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या भाषणाचा कार्यक्रम घेण्यात यावा. त्यासाठी खालील चारोळी म्हणून सुरुवात करावी.)

” रवी किरणांनी न्हावू घातले भारत भूमीला आज.. शिक्षक दिनाची पहाट नटली करण्या शिक्षकांच्या महतीचा आगाज.. मान्यवरांच्या विचारांचा लाभ घेऊया आज !!! ”

मान्यवरांची भाषणे

(यावेळी मान्यवरांची आणि शाळेतील शिक्षक तसेच निवडक पालकांची भाषणे घ्यावीत. त्यानंतर ) धन्यवाद !!!

अध्यक्षीय भाषण

आजच्या या मंगल क्षणी सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री………… यांना आमंत्रित करतो.

( अध्यक्षांचे मनोगत झाल्यानंतर आपण त्यांना धन्यवाद अध्यक्ष साहेब असे म्हणायचे आहे. यावेळी मित्रांनो अध्यक्षांच्या मनोगतातील काही महत्त्वाचे मुद्दे, उपयुक्त विचार आणि सूचना याची माहिती आपण द्यायची आहे. त्यानंतर आपण पुढीलप्रमाणे सूत्रसंचालन करावे.)

आभार प्रदर्शन

मंडळी, आता आजच्या कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प ते म्हणजे आभार प्रदर्शन.

” रंगला आजचा सोहळा ज्यांच्या उपस्थितीने त्या सर्वांचे आभार मानूया नम्रतेने || ”

आजच्या या शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, गुरुजन, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांचे आभार मानण्यासाठी मी माझी मैत्रीण प्रियांका हिस येथे आमंत्रित करतो.

( मित्रांनो आभार प्रदर्शन झाल्यानंतर शेवटी आपण खालील चारोळी म्हणायची आहे.)

” दैवत्वाचा अवतार आहे शिक्षक जीवनाचा आधार आहे शिक्षक ज्ञानाचा सागर आहे शिक्षक आत्मविश्वास देणारी

आणि शेवटी मी पुन्हा एकदा सर्व गुरू जणांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. ( सर्व उपस्थितांना गोड खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करावी.)

Related posts:

Leave a Comment