शिक्षक पात्रता परीक्षेबाबत teacher’s eligibility test exam
संदर्भ :
– १) निर्णय क्र. आरटीई-२०१०/प्र.क्र.२७२/प्राशि-१ दि. १३ फेब्रुवारी, २०१३.
२) राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदचे मार्गदर्शक सूचना क्र. ७६४/२०१०/NCTG/Acad दि. ११ फेब्रुवारी, २०११
३) शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१६/प्र.क्र.३०/टीएनटी-१ दि. २४.०८.२०१८
४) संदर्भ क्र. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे पत्र क्र. मरापप/बापवि /२०१९/६४९४ दि. ०३ ऑक्टोबर, २०१९
आपले संदर्भाधिन दिनांक ०३.१०.२०१९ चे पत्र कृपया पहावे.
०२. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता १ली ते ८ वी च्या शिक्षकांकरीता शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्याकरीता पुढील प्रमाणे सूचनांचे पालन करण्यात यावे.
१. इयत्ता १ ली ते ५ वी च्या गटाकरिता प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त करावयाच्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.। उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२. इयत्ता ६ वी ते ८ वी या गटाकरिता उच्च प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्टीसाठी शिक्षकांना शिक्षक
पात्रता परीक्षा पेपर क्र. ॥ उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
३. इयत्ता ६ वी ते ८ वी या गटाकरिता उच्च प्राथमिक शिक्षकांना इयत्ता १ ली ते ५ च्या गटाकरिता नियुक्तीसाठी संबंधित शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.। उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल. म्हणजेच इ. १ ली ते ५ वी आणि इ. ६ वी ते ८ वी या दोन्ही गटासाठी नियुक्तीसाठी पेपर क्र.। व ॥ उत्तीर्ण करणे आवश्यक राहिल.
अ. LIJA
इयत्ता ६ वी ते ८ वी च्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांना नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. ॥ संबंधित उमेदवाराने त्यांनी प्राप्त केलेल्या पदवीच्या विषयानुसार राहिल. उदा. विज्ञान / गणित विषयासाठी विज्ञान / गणित विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.॥, सामाजिकशास्त्र शिक्षकांसाठी सामाजिकशास्र या विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. ॥ व इतर विषयांसाठी उपरोक्त गणित/विज्ञान आणि सामाजिकशास्र यापैकी कोणताही एका विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. ॥ उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल.










मी सौ सुरेखा शंकरराव भुजबळ माझे मत असे की मी तीस वर्षांपासून इयत्ता एक ते चार ला प्राथमिक शिक्षिका या पदावर सेवेत कार्यरत आहे. टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40% गुण ग्राह्य धरावे असे माझे प्रामाणिक मत आहे. यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही असे मला वाटते.