शैक्षणिक संस्था तंबाखुमुक्त करण्याकरिता नऊ नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत Tobacco free school nine rule
संदर्भ:-
तंबाखू मुक्त शाळा 9 निकष परिपत्रक येथे पहा pdf download
१) केंद्र शासनाच्या सन २०२०-२१ च्या शैक्षणिक संस्था तंबाखुमुक्त करण्या करिताच्या मार्गदर्शक सूचना…
२) मा. संचालक, आरोग्य सेवा, आयुक्तालय, मुंबई यांची दि. २४.१२.२०२० रोजीची मान्य टिप्पणी.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन २०१९-२० या वर्षी केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखू मुक्त करण्याकरिता सुधारित मार्गदर्शक सूचना (Revise Guidelines) ची अंमलबजावणी करण्याबाबत केंद्र शासनामार्फत दि. २२.०९.२०२० रोजी वेबिणार घेण्यात आले आहे. त्या वेबिनारमध्ये प्रत्येक राज्यांनी राज्यातील शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्याकरिता सुधारित नऊ निकषांची अमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे.
शैक्षणिक संस्था तंबाखुमुक्त करण्याकरिता नऊ निकष