प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणोत्तर चाचणी व मूल्यमापन संदर्भात सूचना देणेबाबत training test evaluation
संदर्भ :
-1. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण, दि.२०/०७/२०२१
2. मा. संचालक यांची दिनांक ०६.०६.२०२५ ची मान्य टिपणी
3. मा. संचालक यांची दिनांक ११.०६.२०२५ ची मान्य टिपणी
उपरोक्त विषयात नमूद केल्यानुसार दिनांक ०२.०६.२०२५ ते १२.०६.२०२५ या कालावधीमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थ्यांचे मूल्यमापन करण्याच्या अनुषंगाने खालील सूचना देण्यात येत आहेत.
अ) प्रशिक्षणोत्तर चाचणीच्या अनुषंगाने सूचना
1) सर्व प्रशिक्षण गट व सर्व स्तरांसाठी प्रशिक्षणोत्तर चाचण्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्राचार्यांच्या वैयक्तिक मेलवर दिनांक ११.०६.२०२५ रोजी रात्री ११.०० वाजता pdf (Password Protected) स्वरुपात देण्यात येतील. प्राचार्य यांनी तालुका समन्वयक / वरिष्ठ अधिव्याख्याता यांना त्यांच्या वैयक्तिक मेलवर Password Protected Pdf पाठवावी. गोपनीयतेच्या अनुषंगाने परिषदेमार्फत देण्यात आलेल्या प्रशिक्षणोत्तर चाचणी प्रश्नपत्रिका प्रशिक्षाणार्थ्यांच्या संख्येनुसार नुसार छायांकित प्रती काढून सीलबंद लखोट्यात सुरक्षित ठेवाव्यात. गोपनीयतेचा भंग होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, तालुका समन्वयक / वरिष्ठ अधिव्याख्याता यांची राहील.
2) चाचणी दिनांक १२.०६.२०२५ रोजी ३.१५ ते ५.१५ या कालावधीत घेण्यात यावी.
3) चाचणीसाठी प्रशिक्षाणार्थ्यांच्या संख्येनुसार नुसार, प्रती प्रशिक्षणार्थी 15 ते 16 पानाची उत्तरपत्रिका याप्रमाणे उत्तरपत्रिका उपलब्ध ठेवाव्यात.
4) परीक्षेसाठी बैठक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे.
5) प्रत्येक बेंचवर एक परीक्षार्थी बसण्याची व्यवस्था करावी जर ते शक्य नसेल तर एका बेंचवर एक वरिष्ठ व एक निवड प्रशिक्षणार्थी बसतील अशी बैठक व्यवस्था करावी.
6) उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थी व सुलभक यांची सही घ्यावी.
7) परीक्षेसाठी विहित नियमांचे पालन करण्यात यावे.
8) प्रश्नपत्रिका मराठी माध्यमातून देण्यात येणार आहेत. मात्र उर्दू प्रशिक्षणार्थी उर्दू भाषेतून उत्तरे लिहू शकतात.
ब) प्रशिक्षणार्थी मूल्यमापन तक्ता भरण्याबाबत
1) प्रशिक्षणादरम्यानचे स्वाध्यायांचे तसेच प्रकल्प/नवोपक्रम/कृतीसंशोधन अहवाल यांचे मूल्यमापन व गुणांकन कसे करायचे या विषयीच्या केंद्र संचालकासाठीच्या स्पष्ट सूचना घटकसंच पुस्तिकेत देण्यात आल्या आहेत.
2) प्रशिक्षणादरम्यान गटाने केलेले स्वाध्याय सुलभकांकडून तपासून घेउन केंद्रसंचालकाने बॅचनिहाय एकत्रित करावेत व जमा करुन घ्यावेत.
3) प्रत्येक स्वाध्याय तपासून प्राप्त गुण नोंदवून सुलभकाने स्वाक्षरी केलेली असावी.
4) प्रशिक्षणोत्तर चाचणी तपासून गुणांकन करण्यासाठी व ऑनलाइन नोंद करण्यासाठी प्रशिक्षणानंतरं दोन ते तीन दिवसात कामकाज पूर्ण करावे.
5) ऑनलाइन गुण नोंद केल्यानंतर बॅचनिहाय प्रिंट काढून त्यावर बॅच सुलभकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ते केंद्र समन्वयकाच्या लॉग ईनच्या माध्यमातून त्याच दिवशी अपलोड करावे.
6) प्रशिक्षण संपल्यानंतर ४० दिवसापर्यंत (मंगळवार, दि. २२/७/२५ पर्यंत) प्रशिक्षणार्थ्यांनी आपले गृहकार्य (५ वैयक्तिक स्वाध्याय व प्रकल्प/नवोपक्रम/कृतीसंशोधन) आपल्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये जमा करावेत.
7) दिनांक ०१.०८.२०२५ पर्यंत सुलभकांना प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था कार्यालयात बोलावून प्रशिक्षणार्थ्यांचे वैयक्तिक स्वाध्याय व प्रकल्प/नवोपक्रम/कृतीसंशोधन इ. तपासून ऑनलाइन नोंद करणेबाबत कार्यवाही करावी. गुणांची नोंद ऑनलाइन करुन प्रींट काढून त्यावर सुलभक व केंद्रसंचालकांची स्वाक्षरी घेऊन ते केंद्रसंचालक यांच्या लॉग ईनच्या माध्यमातून अपलोड करावे.
8) प्रशिक्षणासंदर्भातील तासिकानिहाय उपस्थिती पत्रक, प्रशिक्षणार्थ्यांनी जमा केलेले स्वाध्याय, प्रकल्प नवोपक्रम (कृतीसंशोधन अहवाल, गुणदानाचे प्रिंट आउट काढून आपल्या कार्यालयात जतन करून ठेवाव्यात.
9) गुणदानाबद्दलच्या विस्तृत सूचना घटकसंचामध्ये दिलेल्या आहेत,
10) सोबत जोडलेल्या गुणदान तक्त्यानुसार पोर्टलवर गुण नोंदवावेत