विशेषण व्याख्या विशेषणाचे प्रकार व उदाहरण types of adjective
“नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात “.
उदा. राणी सुंदर मुलगी आहे.
वरील वाक्यात मुलगी बददल विशेष माहिती देण्यात आली आहे.
विशेषणाचे प्रकार खालील प्रमाणे
* गुण विशेषण
* संख्याविशेषण
* सार्वनामिक विशेषण
* नामसाधित विशेषण
* धातुसाधित विशेषण
* अव्यवसाधित विशेषण
1) गुण विशेषण
“ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण विशेष दाखवला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात “.
उदा. राज हुशार मुलगा आहे .
वरील वाक्यात हुशार या बददल विशेष माहिती देण्यात आली आहे.
2) संख्या विशेषण
” ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दर्शवली जाते त्यास संख्याविशेषण असे म्हणतात “.
उदा. आमच्या वर्गात चाळीस मुले आहेत
वरील वाक्यात चाळीस या शब्दाने मुलांची संख्या दर्शविली आहे.
संख्या विशेषणाचे प्रकार
1) गणनावाचक संख्या विशेषण
” ज्या विशेषणाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो त्यास गणनावाचक संख्याविशेषण असे म्हणतात
उदा. पाच फळे, सहा पेन
2) क्रमवाचक संख्या विशेषण
” ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूचा क्रम दाखवण्यासाठी केला जातो त्यास क्रमवाचक संख्याविशेषण असे म्हणतात “.
उदा. पहिला नंबर, चौथा मजला
3) आवृत्तीवाचक संख्या विशेषण
” ज्या विशेषणाचा उपयोग किती वेळा याचा बोध करण्यासाठी केला जातो त्यास आवृत्तीवाचक संख्याविशेषण असे म्हणतात “.
उदा. तिप्पट रुपये, चौपदरी रस्ता
4) पृथकत्ववाचक संख्या विशेषण
‘ज्या विशेषणाचा उपयोग वेळेपणाचा बोध करण्यासाठी केला जातो त्यास पृथकत्ववाचक संख्याविशेषण असे म्हणतात “.
उदा. एकेक मुलगा, सहा- सहाची तुकडी
5) अनिच्छित संख्या विशेषण
“जी संख्या विशेषण निच्छित अशी संख्या दाखवत नाही त्यास अनिच्छित संख्या विशेषण असे म्हणतात “.
उदा. काही लोक, थोडा वेळ
3) सार्वनामिक विशेषण
“जी विशेषणे सर्वनामापासून तयार होऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात “.
उदा. मी : माझा, माझी, माझे तूः तुझा, तुझी, तुझे ते
4) नामसाधित विशेषण
“वाक्यामध्ये नामाचा उपयोग विशेषणासारखा होतो त्यास नामसाधित विशेषण असे म्हणतात “.
उदा. तो गाडी मालक आहे.
(गाडी – मूळ नाव, मालक – नामाबद्दल विशेष माहिती)
5) धातूसाधित विशेषण
” एखाद्या वाक्यामध्ये नामाची विशेषणे हि ‘क्रियापदाच्या मूळ रुपापासून बनलेली असतात अशा विशेषणाला धातुसाधित विशेषण असे म्हणतात “.
उदा. तो धावणारा मुलगा आहे.
(धावणारा शब्द मुलगा नामाचे विशेषण आहे. त्याचे मूळ रूप धाव या क्रियापदाच्या मूळ शब्दापासून तयार झाले आहे.)
6) अव्यवसाधित विशेषण
“वाक्यामध्ये काही अव्यव लागून जी विशेषणे तयार झालेली असतात त्याला अव्यवसाधित विशेषण असे म्हणतात “.
उदा. समोरची खिडकी बंद आहे.
समोर या शब्दाला ची हा प्रत्यय लागला आहे








