सन २०२५-२६ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळेच्या ठिकाणाची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदविणेबाबत (U-DISE Plus – GIS Capture Mobile App)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२५-२६ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळेच्या ठिकाणाची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदविणेबाबत (U-DISE Plus – GIS Capture Mobile App)

संदर्भ: केंद्र शासनाचे D.०.२३-५/२०२५-Stats दि. ०२ डिसेंबर, २०२५ रोजीचे पत्र.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी शाळेच्या ठिकाणाची (अक्षांश व रेखांक्ष) अचूक माहिती मोबाईल अॅपद्वारे (U-DISE Plus GIS Capture Mobile App) नोंदविण्याकरिता मोबाईल अॅप दि. ०२ डिसेंबर, २०२५ रोजी राष्ट्रीय सूचना केंद्र, नवी दिल्ली यांच्या सहाय्याने विकसित करून प्रसिध्द केले आहे. सदर अॅपद्वारे संगणकीकृत केलेल्या माहितीचा उपयोग केंद्र/राज्य/जिल्हा/तालुका स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी, नियोजन, शैक्षणिक संसाधने, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, ग्राफिकल विश्लेषण करण्यासाठी करण्यात येणार आहे.

सदरचे अॅप हे Android व IOS ऑपरेटिंग स्टिम असलेल्या मोबाईलवरती इंस्टॉल करण्यासाठी सर्व शाळांना Google Play Store व Apple App Store उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मोबाईलमध्ये U-DISE Plus -GIS Capture अॅप इंस्टॉल करून यु-डायसच्या लॉगिंन व पासवर्डद्वारे मोबाईल अॅपमध्ये लॉगिनकरून शाळेच्या ठिकाणाची माहिती अचूक नोंदवावी. U-DISE Plus – GIS Capture अॅप वापरण्याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना पत्रासोबत उपलब्ध करून

देण्यात येत आहे. याबाबत काही अडचणी आल्यास तालुका/जिल्हा/राज्य स्तरावरील संगणक प्रोग्रामर, MIS-Co-ordinator व ऑपरेटर यांच्याशी संपर्क साधावा.

याबाबत आपणास कळविण्यात येते की, जिल्ह्यातील सर्व शाळांना GIS Capture Mobile App द्वारे शाळेच्या ठिकाणाची माहिती मार्गदर्शक सूचनानुसार तात्काळ नोंदविण्याकरिता आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.

सोबत : केंद्र शासनाचे पत्र व मार्गदर्शक सूचना.

Related posts:

Leave a Comment