युडायसवरील विदयार्थी संख्या व PAT च्या विदयार्थी संख्येबाबत udise pat students 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

युडायसवरील विदयार्थी संख्या व PAT च्या विदयार्थी संख्येबाबत udise pat students 

विषय-युडायसवरील विदयार्थी संख्या व PAT च्या विदयार्थी संख्येबाबत udise pat students

संदर्भ-मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांच्या दि.३०/५/२०२५ रोजीच्या मिटींगमधील सूचना

उपरोक्त विषयी आपणांस कळविण्यात येते की, मा प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांचे दि.३०/५/२०२५ रोजीच्या मिटींग मधील दिलेल्या सूचनेनुसार आपणांस कळविण्यात येते की, मागील तीन वर्षापासून युडायस वरील विदयार्थी संख्या व PAT चाचणीसाठीची विदयार्थी संख्या यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे.

तरी यावर्षी युडायस वरील विदयार्थी संख्या व PAT चाचणीकरिता विदयार्थी संख्या यामध्ये साम्य असावे. त्यासाठी युडायस वर भरण्यात येणारे विदयार्थी संख्या काळजीपूर्वक भरण्यात यावी.

तसेच PAT चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेची मागणी करताना युडायसवर नमूद विदयार्थी विचारात घेतले जाणार आहेत. युडायस वरील विदयार्थी संख्येपेक्षा अधिकची मागणी PAT चाचणीसाठी केल्यास व PAT साठीची विदयर्थी उपस्थिती युडायस पेक्षा अधिकची असल्यास अशा तफावती बाबत त्या-त्या जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment