सन २०२५-२६ या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणीबाबत udise plus pranali
संदर्भ: केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No. २३-२/२०२५-Stats दि. ०३/०४/२०२५.
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीत दि. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यानुसार पुढील प्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे.
दि. ०१ मे, २०२५ पासून सर्व राज्यांकरिता यु-डायस प्लस २०२५-२६ करिता विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र राज्याची सन २०२४-२५ या वर्षाची अंतिम माहिती केंद्र शासनाला दि. १५ मे, २०२५ रोजी पाठविण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दि. २१ मे, २०२५ पासून सुरू झाली आहे.
जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांच्या उपस्थितीमध्ये सभा आयोजित करून सदर सभामध्ये तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, MIS-Coordinator, Data Entry Operator, Civil Engineering, Civil Engineer, IED-Coordinator यांना विद्यार्थ्यांचे प्रमोशनबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. त्याचप्रमाणे गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या स्तरावरून विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि शाळेचे मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण आयोजित करावे.
जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर व MIS-Coordinator यांना विद्यार्थ्यांचे प्रमोशन करताना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून काही त्रुटी
Repeater, Over age, Under age) राहिल्याचे निदर्शनास आल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांकडून नृटींची पूर्तता करून घेणेबाबत सूचना दयावी.
विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना शिक्षण घेणारे एक ही मूल Dropbox मध्ये / शाळाबाह्य राहणार नाही, याची खात्री करण्यासाठी सूचना देण्यात याव्यात. शाळेमध्ये विद्यार्थी Import करित असतांना तांत्रिक अडचणी आल्यास तालुक्याचे MIS-Coordinator यांच्याशी मुख्याध्यापकांनी संपर्क साधवा.
सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमोशन दि. ३० जून, २०२५ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रमोशन पूर्ण झाल्यानंतर पूर्व प्राथमिक व इयत्ता १ली च्या विद्यार्थ्यांची नोंद करण्यासाठी सुविधा सुरू करण्यात येईल.
तरी कृपया सन २०२५-२६ यु-डायस प्लस प्रणालीतील माहिती विहित मुदतीत नोंदविली जाईल यासाठी आपल्या स्तरावरून पुढील कार्यवाही होणेस विनंती.