सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा दिनांक ११ एप्रिल ते २२ एप्रिल, २०२६ या कालावधीत आयोजित करण्याबाबत varahik pariksha date gr
संदर्भ : मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र जा.क्र. राशेसंप्रपम/मूल्यमापन/सं.चा. २जिल्हा पत्र/२०२५-२६/१७६८८५३दि.०९/०३/२०२६.
उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संदर्भीय पत्रान्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-१ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे इयत्ता २ री ते ८ वी करिता नियोजन करण्यात आलेले असून संकलित चाचणी २ (PAT 3) दिनांक ११,१५ व २२ एप्रिल, २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व शाळांनी त्याच दिवशी आयोजित संकलित चाचणी -२ (PAT 3) करून त्याअनुषंगाने कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात यावी. उपरोक्त दिनांकांमध्ये आपल्या स्तरावरुन फेरबदल करण्यात येऊ नये. (सोबत संदभर्भीय पत्राची प्रत जोडली आहे.)
तसेच सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा या मूल्यांकन चाचणी २ (PAT 3) हा कालावधी वगळून उर्वरित दिवशी आयोजित करण्यात याव्यात.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविदयालयामध्ये नियतकालिक मूल्यांकन चाचणी -२ (PAT 3) /, इयत्ता १ ते ८ वी, ९ वी व ११ वी आणि इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेला उपस्थित असणारी
विदयार्थ्यांची संख्या ही ग्राह्य धरण्यात येईल. या अनुषंगाने सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक/योजना, सहाय्यक शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना वार्षिक परीक्षेदरम्यान भेटी देऊन एकूण पटावर विदयार्थी व परीक्षेला उपस्थित विदयार्थी संख्येचा अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर करावा. विदयार्थी उपस्थिती नोंद करण्याच्या सुविधेबाबत यथावकाश कळविण्यात येईल.









