वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण काळात शिक्षकांवर लादलेल्या अटींबाबत varishtha vetan nivad shreni prashikshan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण काळात शिक्षकांवर लादलेल्या अटींबाबत varishtha vetan nivad shreni prashikshan 

संदर्भ :- मा. आमदार ज. मो. अभ्यंकर, सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद यांचे जा.क्र. २३५, दि.११/०६/२०२५ चे पत्र

महोदय,

उपरोक्त संदर्भाकित विषयात नमूद केल्यानुसार आपण या कार्यालयास दिलेल्या निवेदनानुसार खालीलप्रमाणे नमूद करण्यात येत आहे.

१) जून २०२५ मध्ये आयोजित केलेले वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ज्यांना पूर्ण करता आले नाही त्यांच्यासाठी लवकरच ऑफलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल.

२) राज्यामधील काही शिक्षक/मुख्याध्यापक हे दि.३०/०४/२०२५ ते दि.३०/०४/२०२६ या कालावधीत २४ वर्ष अर्हताकारी तवा पूर्ण करित आहेत. परंतु एप्रिल २०२६ पूर्वी सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक/मुख्याध्यापक निवडश्रेणी प्रशिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रियेत सहभागी करून घेण्याबाबत या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२५-२६/०२५३० दिनांक २६.०५.२०२५ अन्वये शासनाकडून परवानगी मागण्यात आली होती व याबाबत शासनाकडून दि.३०/०४/२०२५ च्या पत्राने परवानगी प्राप्त झाली असून एप्रिल २०२६ पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या नोंदणीकृत शिक्षकांना प्रशिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे.

३) प्रशिक्षणासाठी विलंबाने उपस्थित राहिलेल्या व अन्य कारणाने अनुपस्थिती लागलेल्या प्रशिक्षणार्थीच्या उपस्थितीची पडताळणी या कार्यालयाकडून सुरु असून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.

४) सदर प्रशिक्षण हे दिनांक २०.०७.२०२१ च्या शासन निर्णयानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राबविण्यात आले आहे. प्रशिक्षण कालावधीतील बदली रजेबाबत सक्षम अधिकाऱ्यामार्फत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

Related posts:

Leave a Comment