निसर्गाला अनुकूल व पर्यावरणविषयक संवर्धन संवेदनशीलतेचा दृष्टीकोन शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यामध्ये व समूदायामध्ये विकसित करण्यासाठी इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच स्थापन करून पर्यावरण विषयक उपक्रम शाळास्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत ecoclub for mishan life mancha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निसर्गाला अनुकूल व पर्यावरणविषयक संवर्धन संवेदनशीलतेचा दृष्टीकोन शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यामध्ये व समूदायामध्ये विकसित करण्यासाठी इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच स्थापन करून पर्यावरण विषयक उपक्रम शाळास्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत ecoclub for mishan life mancha 

संदर्भ

: १) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको/२/२०२४-२५/१४४५. दि. २२/०५/२०२५

Pdf download

२) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको क्लब (Plant४mother)/२ /२०२४-२५/१७७१, दि. २४/०६/२०२५

३) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको (Plant४mother)२/२०२४-२५/१९९५, दि. ०९/०७/२०२५

४) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको (Plant mother)२/२०२४-२५/२२६४, दि. २५/०७/२०२५ ५) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको

(Plant mother)/२/२०२४-२५/२२९१, दि. २८/०७/२०२५ ६) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको

(Plant mother)२/२०२४-२५/२३६७, दि. ०१/०८/२०२५ ७) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको क्लब/२

२०२४-२५/२८४८, दि. २३/०९/२०२५

८) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको क्लब/२ २०२४-२५/३०५०, दि. ०९/१०/२०२५

९) केंद्रशासनामार्फत आयोजित V.C. दिनांक १६/१२/२०२५

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने, केंद्र शासनाने इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत पर्यावरण विषयक उपक्रम राबविण्यासाठी १००% सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इको क्लब स्थापन करून

त्याबाबतची माहिती http://ecoclubs.education.gov.in या पोर्टलवर अपलोड करणेवावत संदर्भिय पत्रांन्वये आपणांस कळविण्यात आले होते.

प्रत्येक शाळांमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच दि. २५/०७/२०२५ पर्यंत स्थापन करणे व इको क्लब स्थापन केल्याचे विहित नमुन्यातील अधिसूचना इको क्लब फॉर मिशन लाईफ अपलोड करणेबाबत विस्तृत पणे मार्गदर्शक सूचना या कार्यालयाच्या संदर्भ पत्र क्र. १ अन्वये निर्गमित करण्यात आलेले आहेत.

तथापि, इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलवरील (http://ecoclubs.education.gov.in) प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांनी इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच स्थापन केल्याबाबतची माहिती कमी प्रमाणात पोर्टलवर अपलोड केली असल्याचे दिसून येत आहे.

सदर वस्तुस्थिती जिल्हा नोडल अधिकाऱ्यांना नियमित Whatsapp Group शेअर करण्यात येते. इको क्लव फॉर मिशन जागतिक पर्यावरणीय उपक्रम २०२५-२६ पोर्टलवरील प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता इको क्लब स्थापनेची टक्केवारी ६२.६५% इतकी आहे.

सोवत (Annexure -१ ) मध्ये जिल्हानिहाय वस्तुस्थिती दर्शविण्यात आलेली आहे. विशेषतः पुणे, लातूर, नागपूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, सोलापूर, धुळे, सांगली, नंदूरबार, मुंबई DYD. छत्रपती संभाजीनगर या जिल्हयांतील ५०% पेक्षा कमी शाळांमध्ये अद्यापही इको क्लब मंच स्थापन केलेले दिसून येत नाही. याबाबत केंद्रशासनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. केंद्रशासनाकडून इको क्लव फॉर मिशन लाईफबाबत V.C. घेण्यात येणार आहे. तरी उपरोक्त जिल्हयांनी ५०% पेक्षा कमी शाळांमध्ये अद्यापही इको क्लब मंच स्थापन करणेबाबतची कार्यवाही का केलेली नाही. याबाबतची कारणे उपरोक्त जिल्हयांनी दि. १८/१२/२०२५ पर्यंत या कार्यालयास सादर करणेबाबत आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावेत.

शासन परिपत्रक pdf download

सोबत (Annexure -१) मध्ये जिल्हानिहाय वस्तुस्थिती देण्यात आलेली आहे. आज दि. १६/१२/२०२५ रोजी केंद्रशासनामार्फत आयोजित V.C. मध्ये दि. २९/१२/२०२५ पर्यंत १००% शाळांमध्ये इको क्लब मंच स्थापन करणेबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने सर्व जिल्हयांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये १००% इको क्लब मंच स्थापन करणेबाबत कार्यवाही दि. २९/१२/२०२५ रोजीपर्यंत करावी. इको क्लब फॉर मिशन लाईफबाबतचे उद्दिष्टे पूर्ण होईल, असे पाहावे.

Related posts:

Leave a Comment