वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ च्या अहवालामधील वेतनश्रेण्या विषयक व अनुषंगिक शिफारशी स्वीकृत करून कार्यवाही करणे बाबत vetan truti nivaran samiti 

वेतन त्रुटी निवारण समिती २०२४ च्या अहवालामधील वेतनश्रेण्या विषयक व अनुषंगिक शिफारशी स्वीकृत करून कार्यवाही करणे बाबत vetan truti nivaran samiti

परिपत्रक येथे पहा pdf download

संदर्भ :- १. वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक वेपुर ११२५/प्र.क्र ०१/सेवा-९/दिनांक ०२ जून २०२५

२. महाराष्ट्र राज्य पदवीधर प्रा. शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना खेड यांचे कडील जा.क्र ७८/२५ दि. ०९.०६.२०२५

३. वित्त विभाग (वेतन पडताळणी शाखा) यांचेकडील मान्य टिपणी दिनांक २४.०७.२०२५

उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून कळविणेत येते की, शासनाने वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी व त्यावर शासनाने याबाबतचा तपशिल संदर्भीय शासन निर्णयातील जोडपत्र १ ते३ मध्ये नमूद करण्यात आलेला आहे.

शासन निर्णयातील शिफारशी लागू करताना संबधित पदवीधर शिक्षक हे उपशिक्षक असता तर एस१३ मध्ये दिनांक ०१.०१.२०१६ रोजी किती वेतन निश्चित झाले असते व सद्या एस-१४ मध्ये किती निश्चित झालेले आहे याची खात्री करावी व तदनंतरच वेतनत्रुटीतील शिफारशी नुसार एस १४ मध्ये वेतन वाढविण्यात यावे.

परिपत्रक येथे पहा pdf download

शासन निर्णयातील जोडपत्र २ मधील स्वीकृत केलेले अनुक्रमांक ३१ मध्ये नमूद केल्यानुसार मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प. पुणे कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाकडून वेतननिश्चितीची पडताळणी करून तदनंतरच संदर्भीय शासन निर्णयानुसार सुधारित वेतन स्तरचे प्रत्यक्ष अर्थिक लाभ दिनांक ०१ जून २०२५ पासून देण्यात यावेत, मात्र दिनांक ०१ जानेवारी २०१६ ते दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत थकबाकी अनुज्ञेय ठरणार नाही. सोबत जोडलेल्या नमुन्यामध्ये वेतननिश्चिती करण्यात यावी.

परिपत्रक येथे पहा pdf download

Leave a Comment