TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५ प्रसिद्धी निवेदन teacher eligibility test
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५ प्रसिद्धी निवेदन
शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी करण्यात आले होते.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ पेपर क्र. १ व पेपर क्र. २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १९/१२/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.
परीक्षेसाठी पेपर क्र. १ व पेपर क्र. २ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/आक्षेप असल्यास परिषदेकडे दि. १९/१२/२०२५ ते दि. २७/१२/२०२५ अखेरपर्यंत पाठवता येतील. सदर आक्षेप/त्रुटी बाबतचे निवेदन पुराव्यासह https://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील, आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष/टपालाने/ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
(विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)











