२६ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय पातळीवर “वीर बाल दिवस” साजरा करण्याबाबत virbal divas 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

२६ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय पातळीवर “वीर बाल दिवस” साजरा करण्याबाबत virbal divas 

संदर्भ

: १. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे पत्र D.N.No: १७-९/२०२३-Coord दि. १७ डिसेंबर २०२५..

२. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे पत्र F.No.१-३४/२०२५ MediaCell (DoSEL) दि. २२/१२/२०२५.

उपरोक्त संदर्भीय विषयीनुसार दरवर्षी २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिवस हा देशव्यापी उत्सव म्हणून आयोजित केला जातो. जो भारताच्या भविष्याचा पाया म्हणून मुलांना सन्मानित करण्यासाठी साजरा केला जातो. सदर उपक्रम किशोरवयीन विद्यार्थ्यांचे मनोसंवर्धन करणे, त्यांची सर्जनशीलता वाढवणे आणि त्यांना विकसित भारताच्या दृष्टीकोनात योगदान देण्यासाठी प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश आहे. शाळांमध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी उपक्रमाची यादी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचेकडून पाठविण्यात आली होती. ती पुढीलप्रमाणेः

वीर बाल दिवस २०२५ साजरा करण्यासाठी विविध उपक्रमाची यादी

१. वयोगटानुसार स्पर्धा

अ. वयोगट (३-६ वर्षे): रेखाचित्र/चित्रकला, क्रीडा उपक्रम, कथाकथन इ.

ब. वयोगट (६-१० वर्षे): चित्रकला, निबंध लेखन आणि कथाकथन

विषय :

१. भारतासाठी माझे स्वप्न

२. मला पहायचा आहे भारत

३. इतरांना मदत करण्यासाठी माझी महाशक्ती

४. माझ्या संस्कृतीचे रंग

५. माझ्या भोवतीचे नायक (शिक्षक, मित्र, इ.)

क. वयोगट (११-१८ वर्ष): निबंध, कविता, वादविवाद डीजीटल विषयांवर सादरीकरण जसे की १. राष्ट्र उभारणीत मुलांची भूमिका

२. विकसित भारतासाठी माझी दृष्टी

३. विकसित भारताला आकार देण्यात मुलांची भूमिका

1/1624824/2025

४. धैर्य आणि करुणाः नायक कशामुळे बनतो ? शौर्याच्या कथा भारताचा इतिहास

५. तरुणांसाठी डीजिटल इंडीयाच्या संधी

६. स्वच्छ भारत, स्वस्थ भारत

७. बेटी बचाव बेटी पढाओ प्रत्येक मुलीला सशक्त

८. आत्मनिर्भर भारत – नवोन्मेषाचे चालक म्हणून युवक

९. भारतातील पारंपारिक हस्तकलेचा उत्सव साजरा करणाऱ्या स्थानिकांसाठी गायन

१०. भविष्यासाठी तरुणांना तयार करणारे स्किल इंडिया मिशन

११. अमृत कालः उद्याचा भारत घडवणारे युवक

२. पीएमआरबीपी पुरस्कार विजेते :

परिपाठ किंवा विशेष सत्रांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) पुरस्कार विजेत्यांच्या प्रेरणादायी कथा सादर करणे.

टीप :

१. वरील उपक्रम हे सूचक स्वरूपाचे आहेत आणि त्यात सर्व वयोगटातील उपक्रमांचा समावेश आहे. विविध उपक्रमाचे मुलांच्या वयानुसार आणि शिक्षण स्तरानुसार आयोजन करावे.

२. नमूद केलेल्या उपक्रमांव्यतिरिक्त अतिरिक्त उपक्रम हाती घेण्यास प्रोत्साहित केले जावे. ते त्यांच्या स्थानिक संदर्भ, संसाधने आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार उपक्रमाचे आयोजन करू शकतात.

शासन परिपत्रक pdf download

त्यानुसार, २६ डिसेंबर २०२५ हा दिवस “वीर बाल दिवस” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करणे तसेच सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित करण्यासाठी सर्व संबंधितांना आवश्यक निर्देश देण्यात यावे. सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर https://forms.gle/Uc5y1UMYL7Qkfa298 या लिंकमध्ये सविस्तर माहिती भरण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment