WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

२६ नोव्हेंबर संविधान दिन जबरदस्त सूत्रसंचालन

स्वागतम स्वागतम स्वागतम

मी सर्व प्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरवात करतो ….

माझे संविधान, माझा अभिमान !

वाढवली त्याने, जगती आमुची शान !

सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान !

माझे संविधान माझा जीव की प्राण !

राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे जो सरकारचे अधिकार आणि मर्यादा आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये यांची रूपरेषा देतो. हा एक अत्यावश्यक दस्तऐवज आहे जो देशाच्या शासनाची चौकट निश्चित करतो.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असणा-या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने ख-या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. मात्र त्याची ख-या अर्थाने अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली.

न्याय, स्वातंत्र्य, बंधुता व समानतेचे !

असे हे संविधान थोर व्यक्तींच्या परिश्रमाचे !!

हमारे देश का संविधान है हमारी आन, बान और शान

सर्व मान्यवरांना मंचावर स्थानापन्न करणे

असतो मा सद् गमय ..

तमसो मा ज्योतिर्गमय…

मृत्योर्मा अमृतं गमय…

वाईटाकडून चांगल्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मरणशिलतेतून अमरत्वाकडे नेणारे आहे व कुशल नेतृत्व असलेले

अध्यक्ष निवड

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो

कार्यक्रमाचे अध्यक्ष :-………

न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता

दिली ही महान तत्वे संविधानाने

जात, धर्म, प्रांत, भाषा विसरून

जगूया आपण फक्त माणुसकीने

आजचे आपले प्रमुख पाहुणे………..,… स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो हे स्थान

अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभण्यासाठी आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडण्यासाठी जेष्ठांचे नेहमीच मार्गदर्शन हवे असते म्हणून आजच्या कार्यक्रमात हे मार्गदर्शक म्हणून …………….. हे स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रत्येक पाहुण्यांसाठी शब्द रचनेत थोडा बदल करावा………… व स्थानापन्न होण्यास सूचित करावे.

माझे संविधान, माझा अभिमान !

वाढवली त्याने, जगती आमुची शान !

सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान !

माझे संविधान माझा जीव की प्राण !

प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन

एक छोटीसी ज्योत प्रतिक म्हणून काम करते

थोडासा का होईना पण अंधार दूर करते.

जीवनाला हवी प्रकाशाची वाट

दिव्यामध्ये जळते छोटीशी वात

तरीही तिला आहे मानाचे स्थान

हे आपणास आहे ज्ञान

तेव्हा स%A

Related posts: