शुद्धलेखनाचे नियम अनुस्वार, दीर्घ, ऱ्हस्व उकार पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी नियम shuddhlekhan niyam
वेलांटी नियम
नियम पहिला – कोणताही शब्द असेल तर त्या शब्दातील शेवटच्या अक्षराला नेहमी दूसरी वेलांटी द्यायची व उकारही दूसराच द्यायचा
परंतु काही शब्द या नियमाला अपवाद आहेत. अपवाद म्हणजे हे चार-पाच शब्द या नियमात बसत नाहीत. ते कोणते शब्द आहेत ते आपण पाहू ते फक्त आपण लक्षात ठेवायचे.
अपवाद – परंतु, आणि, किंतु, तथापि हे चार शब्द फक्त नियमात बसत नाहीत.दोन शब्द वेलांटीचे आहेत व दोन शब्द उकाराचे आहेत.यांना पहिला उकार आणि पहिली वेलांटी आहे.
नियम दुसरा – एक अक्षरी शब्द असेल तर त्याला दुसराच उकार आणि दुसरीच वेलांटी येते. उदा.- पी, मी, ती, ही उदा.- तू, धू
अपवाद – या नियमाला सुद्धा एक अपवाद शब्द आहे.-नि हा शब्द आपण कधी वापरतो तर हा शब्द आपण गोष्ट वाचताना नि हा शब्द असतो.
उदा. राम नि शाम दोघे फिरायला गेले. या दोन नावाच्या मध्ये नि वापरला या नि चा अर्थ आणि असा होतो.
नियम तिसरा – जोडअक्षरामध्ये जोडअक्षक्षराच्या आधिच्या शब्दाला नेहमी पहिली वेलांटी किंवा पहिलाच उकार छद्यायचा.
उदा. – पुस्तक, चिठ्ठी, किल्ला, तिच्या, तुम्हाला, तुझ्या, तुम्ही, दिल्ली
नियम चौथा – रफाराच्या आधिच्या अक्षराला नेहमी उकार किंवा वेलांटी असेल तर ती नेहमी दुसरी द्यायची. उदा. पूर्व, दीर्घ, आशीर्वाद, तीर्थ, सूर्य
नियम पाचवा – हा नियम काही शब्दांना लागू होतो काही शब्दांना नाही तर तो नियम कोणता ते पाहूया आता हे दोन शब्द बघा वीट विटा वेलांटी असलेल्या शब्दाच्या पुढचे अक्षर आहे ज्याला जर काना, मात्रा, उकार, वेलांटी असेल तर त्याला पहिली वेलांटी द्यायची, आणि काहीच नसेल फक्त एकटच अक्षर असेल तर आधिच्या अक्षराला दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार येतो. उदा.- फुगा, फूल, कीड, जीभ, कूट
नियम सहावा -मराठी शब्दातील अनुस्वारयुक्त अक्षरांना पहिली वेलांटी असते. (वेलांटी आणि अनुस्वार एकत्र असलेले शब्द) उदा.-चिंच, डाळिंब, भिंगरी, जलसिंचन, रिंगण, भिंग, किंमत, चिंता
अनुस्वाराचे नियम
एखाद्या शब्दातील ज्या अक्षराचा उच्चार नाकातून होतो, त्या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा.
उदा रंग, फांदी, निबंध, आनंद, भुंगा, सुंदर, अंग, संगत इ.
एखाद्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या अनेकवचनी रूपाला जोडून स, ना, नी, चा, ची, चे, साठी, समोर अशी अक्षरे आली, तर त्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वार द्यावा.
उदा.
फुले- फुलांना
बैल – बैलांचे
त्या – त्यांना
रस्ते – रस्त्यांसमोर
घरे – घरांसाठी
ज्या – ज्यांना
एखाद्या आदरार्थी बहुवचनी नामाला जोडून (स, ना, नी, चा,ची, चे, साठी) अशी अक्षरे आली, तरीही त्या नामाच्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वार द्यावा.
उदा.
गुरुजी – गुरुजींना
बाबा – बाबांना
काका – काकांचा
मामा – मामांचा
संत ज्ञानेश्वर – संत ज्ञानेश्वरांनी
दुसरी वेलांटी व दुसरा उकार नियम
एक अक्षरी शब्दातील शेवटचा ‘इ’ किंवा ‘उ’ हा स्वर दीर्घ लिहावा.
उदा.
ती, मी, की, तू, धू इ.
कोणत्याही शब्दातील शेवटचा ‘इ’ किंवा ‘उ’ हा स्वर दीर्घ लिहावा.
उदा .
धरती, नदी, शक्ती, फुलपाखरू, पशू, गुरु
वरील शब्द एखाद्या जोडशब्दात सुरुवातीला आला तर, त्यांच्यातील शेवटचा ‘इ’ किंवा ‘उ’ हा स्वर हस्व लिहावा.
उदा.
पशुपक्षी, नदिनाले, गुरुकृपा, शक्तिमान
आणि, नि, अद्यापि, परंतु, तथापि या शब्दांतील शेवटचा ‘इ’ आणि ‘उ’ हा स्वर हस्वच लिहावा.
(अ-कारान्त) शेवटी ‘अ’ हा स्वर असलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरा लगतच्या मागच्या अक्षरातील ‘इ’ किंवा ‘उ’ हा स्वर दीर्घ लिहावा.
उदा.
खुश, पीक, बहिण, मीठ






