पवित्र पोर्टलव्दारे होणा-या शिक्षक भरती करीता बिंदुनामावली अद्यावत करणेबाबत pavitra portal shikshak bharti
सदर्भ-
१) सामान्या प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं बी सी सी-२०२४/प्र.क्रं.२४६(ई-८४८५०३)/आरक्षण-५ मंत्रालय मुबई दि. २३/०९/२०२५
२) मा. आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे याचे पत्र क्रं आस्था-क/प्राथ १०६/टेट-२५/बिंदु-तपा/२०२५/१५०२४४८ दि. १७/१०/२०२५
३) या कार्यालयाचे पत्र क्रं यजिप/खाप्राशा/आस्था-९/कावि/५३११/२०२५ दि ०७/११/२०२५
४) सहायक आयुक्त मा.व.क. अमरावती विभाग अमरावती यांचे पत्र क्रं बिंदुना/खाशंस/प्र.क्र./स.म.अ-२ दि. २७/०२/२०२६.
उपरोक्त विषयान्वये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठी खाजगी व्यवस्थापनांना जाहीरात नोंद करण्याची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व खाजगी शैक्षणिक संस्थानी रिक्त पदे भरण्याकरीता बिंदु नामावली अद्यावत करण्याबाबत सदर्भ क्रं १ व २ अन्वये दिलेल्श्या निर्देशानुसार सदर्भ क्रं ३ अन्वये बिंदुनामावली नोंदवही अद्यावत करुन तपासणी करीता सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.
पंरतु अजून पर्यंत अनेक शैक्षणिक संस्थानी वर नमुद केलेल्याप्रमाणे कार्यवाही केलेली नाही. तेव्हा सदर्भ क्रं १.२.व ४ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार सन २०२५-२०२६ च्या संचमान्यतेनुसार बिंदुनामावली नोंदवही तपासणी करीता तात्काळ सादर करावी. ज्या शाळांनी दि. २०/०३/२०२६ पर्यंत बिदुनामावली नोंदवही सादर केली नाही. त्या शाळांचे पुढील महिन्यापासुनचे वेतन देयक पारीत होणार नाही.
तसेच मा. सहायक आयुक्त मा.व.क. अमरावती विभाग अमरावती यांच्याकडुन बिंदुनामावली मंजूर न झाल्यामुळे पवित्र पोर्टल पदभरती करीता विलंब झाल्यास त्याबाबतची सर्वस्वी जवाबदारी संबधित शाळेच्या मुख्याध्यापक व संस्थेची राहील यांची नोंद घ्यावी.










