समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -२०२५ परीक्षेच्या निकालाबाबत प्रसिद्धी निवेदन kendrapramukh pariksha result
महोदय,
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -२०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०३/०२/२०२६ व ०४/०२/२०२६ या कालावधीत तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले होते. परीक्षेसंदर्भातील परीक्षेच्या निकालाबाबत प्रसिद्धी निवेदन यासोबत जोडलेले आहे.
सदर प्रसिध्दी निवेदन आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.










