दि.२५.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत shasan nirnay amalbajavani 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि.२५.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत shasan nirnay amalbajavani

संदर्भ

:- १. शासन निर्णय क्रमांक प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि.२५/०८/२०२५ २.जा.क्र. प्राशिसं/खाप्राशा/मुल्यांकन/२०२५/ड ५०४/०३७४५, दि.२९/०८/२०२५

३. संचालनालयाचे पत्र शिसंमा-२०२६ (एस-७)/ टप्पा अनुदान/१७४८२२४, दि.२७/०२/२०२६

वरील संदर्भीय पत्रे पाहावीत.

शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ अन्वये टप्पा अनुदान व नव्याने २० टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा, वर्ग/तुकडयासंदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करणेबाबत आपणास निर्देश देण्यात आलेले आहेत.

शासन निर्णय दिनांक २५/०८/२०२५ मधील अटी व शर्तीनुसार आपले स्तरावर २० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या माध्यमिक शाळा व तुकडयांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे ५ दिवसात सादर करावेत. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्राप्त शालार्थ आयडी प्रस्तावाची पडताळणी करून १० दिवसात संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालर्थ आयडी देण्याची कार्यवाही आपणास वरील संदर्भ क्र.३ चे पत्रान्वये कळविण्यात आले होते.

सदर प्रकरणी आपले स्तरावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा. तसेच शालार्थ आयडी अभावी २० टक्के अनुदानासाठी पात्र शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन अदा न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदार आपली राहील याची नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment