पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत pavitra portal shikshak padbharti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपध्दतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत pavitra portal shikshak padbharti 

वाचा :

१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, समक्रमांक, दि. २०.०१.२०२६

२. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आस्था/प्राथ./१०६/पवित्र-मुशि-प्राधा/२०२६/१७७२४७६, दि. १०.०३.२०२६

शासन शुध्दीपत्रक :

संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयातील परिच्छेद १ येथील तक्त्यातील अ.क्र. २ येथे “लागू करावयाची तरतूद” या स्तभांत खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे.

उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि, उमेदवारास त्याच्या सोईनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल.”

२. उपरोक्त तरतुदीऐवजी खालीलप्रमाणे सुधारित तरतूद वाचण्यात यावी.

उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि, मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोईनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण १०० प्राधान्यक्रम लॉक करता येतील. तसेच मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोईनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील.”

३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०४०२१३२१३०५५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment